पीक विम्याचा हप्ता : दलालांचा सुकाळ, शेतकऱ्यांची धावाधावपुसद : निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेतलेले शेतकरी सध्या पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी बॅकांमध्ये गर्दी करून आहेत. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत तर शेतकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. याचा फायदा घेण्यासाठी दलालही सक्रिय झाले आहेत. तर बँक कर्मचाऱ्यांचा गोधळ उडत आहे. गतवर्षी खरीप हंगामात पिकांचे मोटे नुकसान झाले. पावसाने दडी मारल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती. त्यातच जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने पीक विमा मंजूर झाला. गतवर्षी पीक विम्याची मुदतदेखील वाढवून आणण्यात आली होती. यंदा ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. या मुदतीच्या आत पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धवपळ सुरू आहे. सध्या पुसद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर जत्रेचे स्वरूप आले आहे. चालू वर्षीचा पीक विमा भरण्यास शेतकरी उत्सुक आहे. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच पीक विम्याचा फॉर्र्म भरून देणारे दलाल बसलेले आहेत. फॉर्म भरुन देण्यासाठी दलाल १०० ते २०० रुपये घेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तसेच दलालांनी भरलेला फॉर्मच अधिकारी लवकर स्वीकारत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दलालाकडे शेतकऱ्यांची गर्दी अधिक आहे.पुसद परिसरात एक महिन्यापासून दमदार पाऊस झाला नाही. खरिपाच्या पिकांचा पीक विमा भरण्यासाठी लगबग सुरू आहे. गतवर्षीच्या पीक विम्याचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात पडला नसला तरी नवीन पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यामुळेच बँकेत गर्दी दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)गतवर्षीच्या पिकांचा विमा मंजूर झाल्याने यंदा विमा हप्ता भरण्याकडे कल शेतकऱ्यांची कसरत३१ जुलैच्या आत पीक विम्याचा अर्ज भरुन देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी करसरत होत आहे. आधी तलाठी कार्यालय, नंतर कृषिसेवक तसेच कृषी सहायक यांच्याकडून अर्ज भरुन घ्यावा लागतो. त्यानंतर बँकेत विम्याची रक्कम जमा करावली लागते. दरम्यान, सध्या पावसाने उघाड दिलेली असल्याने शेतात जाण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे या वेळेस पीक विमा काढून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यवतमाळ जिल्हा बँकेच्या पुसद शाखा व्यवस्थापकांशी संपर्क केला असता, २०१४-१५ या हंगामासाठी पुसद तालुक्यासाठी १० कोटी ५८ लाख आठ हजार एवढा पीक विमा मंजूर झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद शाखेअंतर्गत ८४ गावे येतात. या शाखेत ३ हजार ५०० लाभार्थी आहेत. आतापर्यंत पुसद, गौळ, जांबबाजार, वरुड या सर्कलच्या लाभार्थ्यांना पीक विमा वाटप झाले असून २२ जुलैपासून बेलोरा सर्कलच्या लाभार्थ्यांना विमा वाटप होणार आहे. - एम.एस. बेले शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक पुसद
बँकांमध्ये अलोट गर्दी
By admin | Updated: July 22, 2015 00:16 IST