शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अकोला संघाला फुटबॉलचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:05 IST

पोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला.

ठळक मुद्देपोलीस क्रीडा स्पर्धा : ४०० मीटर रिलेमध्ये यवतमाळ अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस कवायत मैदानावर फुटबॉलच्या अंतिम सामन्यात विक्रांत अंभोरे व अब्दुल फईम यांनी केलेल्या शानदार गोलमुळे अकोला संघाने अमरावती शहर संघाचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करीत अजिंक्यपदाचा मान पटकाविला. यवतमाळ संघाला तिसºया स्थानावर समाधान मानावे ेलागले, तर अ‍ॅथलेटिक्समध्ये यजमान यवतमाळ संघाने दबदबा कायम ठेवत चार बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत महिला संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.पोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान व नेहरू स्टेडियम येथे यवतमाळ पोलीस दलाच्यावतीने अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे ६ नोव्हेंबरपासून आयोजन सुरू आहे. शुक्रवारी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात नेहरू स्टेडियम येथे अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा घेण्यात आल्या.८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात अमोल काचेवार (वाशिम) व अमोल वाकोडे (बुलडाणा) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकाविले. महिला गटात यवतमाळच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. यवतमाळच्या प्रतीक्षा केणे व पूजा जुमनाके यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान प्राप्त केले.तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत प्रकाश जवादे (बुलडाणा) अव्वल स्थानी राहिला. यवतमाळचा योगेश बनकर याने दुसरे स्थान पटकाविले.चार बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत पुरुष गटात अकोला संघातील सागर देशमुख, इम्रान शहा, राजू इटकरे, संतोष दाभाडे या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला. यवतमाळ संघातील सागर चिरडे, अशोक राठोड, संकेत बोपचे, कुणाल जाधव हे धावपटू उपविजयी ठरले. महिला गटात यवतमाळ संघ विजयी ठरला. या संघात प्रतीक्षा केणे, शारदा देठे, वनिता पवार, प्रीती पवार यांचा समावेश होता. सीमा भुतेकर, निर्गुणा सोनटक्के, सीमा ठाकूर, हिना खान या बुलडाणा संघातील खेळाडूंना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.दुपारच्या सत्रात पोलीस कवायत मैदानावर फुटबॉल खेळाचे अजिंक्यपद अकोला संघाने पटकाविले. अमरावती शहर संघ उपविजयी ठरला. तिसºया स्थानासाठी यवतमाळ विरूद्ध अमरावती ग्रामीण असा सामना झाला. यवतमाळच्या मंगेश येरखडे याने सेंटर हाफवरून दोन शानदार गोल करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत व्हॉलिबॉल पुरुष गटातील उपांत्य सामने झाले. पहिल्या सामन्यात अमरावती ग्रामीण संघाने बुलडाणा संघाचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसºया उपांत्य सामन्यात यजमान यवतमाळ संघाने अमरावती शहर संघाचा २५-१३ व २५-१६ असा दोन सेटमध्ये पराभव केला. विजयी संघात रेहान खान, मुन्ना प्रधान, नीलेश राठोड, अमोल चाटे यांनी महत्त्वाची भूमिका बािवली.बापू रामटेके, प्रा.डॉ. सचिन जयस्वाल, नासीर शेख यांनी पंच म्हणून काम केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, उपनिरीक्षक संतोष बामरेकर, मोरेश्वर गोफणे, विजय लोखंडे, सचिन जयस्वाल, साहेबराव राठोड, हर्षल जामोदकर, भाऊराव बोकडे, बाबूसिंग राठोड, योगेश बनकर, सोनू मुंडे, प्रकाश दर्शनवार, पांडुरंग कवरासे, संजय नागे आदी परिश्रम घेत आहेत.