शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकूलित तीन मजली अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 21:59 IST

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता यवतमाळ नगरपरिषद अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारत आहे. ही तीन मजली इमारत पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । यवतमाळात विद्यार्थ्यांची सोय : ई-लायब्ररी, समुपदेशन, प्रत्येक टेबलवर संगणक

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या विद्यार्थ्यांसाठी आता यवतमाळ नगरपरिषद अद्ययावत अभ्यासिका केंद्र साकारत आहे. ही तीन मजली इमारत पूर्णपणे वातानुकूलित राहणार आहे. विशेष म्हणजे, पुस्तकांसह संगणकांची रेलचेल येथे राहणार असून तज्ज्ञांकडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समुपदेशनही केले जाणार आहे. ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्र’ येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.दारव्हा मार्गावर शकुंतला रेल्वेस्थानकाच्या पुढील जागेत या अभ्यासिका केंद्राची टोलेजंग इमारत सध्या निर्माणाधीन आहे. राजस्थानातील जवळपास दीडशे कारागीर या केंद्राला खास राजस्थानी ‘लूक’ देण्यासाठी झटत आहेत. नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्रासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.अशी असेल तीन मजल्यांची रचनातळमजल्यावर ई-लायब्ररी राहणार आहे. जवळपास दीडशे टेबल राहणार असून प्रत्येक टेबलवर संगणक दिला जाणारआहे. वेगवान इंटरनेट कनेक्टिवीटी दिली जाणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला एखादी माहिती तातडीने मिळवायची असल्यास त्याला देशातील कोणत्याही नामवंत संस्थेशी लगेच ‘कनेक्ट’ होता येणार आहे. वरच्या पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांना आरामात बसून वाचन करण्याची सुविधा राहणार आहे. शिवाय या मजल्यावर पुस्तकांचा अद्ययावत संग्रह उपलब्ध राहणार आहे. तर शेवटच्या मजल्यावर समुपदेशनासाठी ऐसपैस सभागृह राहणार असून तेथे एलईडी प्रोजेक्टर देण्यात येणार आहे. आयआयटी खडकपूरसारख्या संस्थांमधील तज्ज्ञही या प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकणार आहेत. या केंद्राला देशभरातील संस्थांची संलग्नता मिळविली जाणार आहे. १५ आॅगस्टपर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प बांधकाम अभियंते आणि कंत्राटदाराने बोलून दाखविला आहे.‘मिसाईल मॅन’चे पोर्ट्रेटअभ्यासिका केंद्राच्या टोलेजंग इमारतीसाठी खास जोधपुरी स्टोन वापरले जात आहेत. तर केंद्राच्या प्रवेशस्थळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भव्य पोर्टेट लावले जाणार आहे. राजस्थानातील कारगीर सध्या या पोर्टेटसाठी जोधपुरी दगडांवर कारीव काम करीत आहेत. डॉ. कलाम यांच्या मुद्रेसह भारताची राजमुद्रा, वंदेमातरम् कोरले जात आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भव्य मुद्रेतून प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांना वाचनाचा व्यासंग आणि संशोधक वृत्तीची प्रेरणा मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांची देखरेखसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, यवतमाळचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपेल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुलकर्णी यांच्या देखरेखीत या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी खास सोयडॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्रात सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबतच अंध विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा राहणार आहे. त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतील पुस्तके येथे ठेवली जाणार आहेत. अभ्यासिका केंद्रात बसणाºया विद्यार्थ्यांना एकग्रतेसाठी निरव शांतता लाभावी म्हणून अभ्यासिकेच्या भिंती ‘अ‍ॅकॉफ्सिक’ पद्धतीने तयार केल्या जात आहेत. त्यामुळे कुणी बोलले तरी आवाज घुमणार नाही. येत्या १५ आॅगस्टपर्यंत इमारतीचे संपूर्ण काम पूर्ण करून स्वातंत्र्यदिनाला उद्घाटनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्घाटनानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत येथील कामकाज चालणार आहे.

टॅग्स :libraryवाचनालय