शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गळाभेट घेतल्याने, सोबत जेवल्याने एड्स पसरत नाही; धीर, मानसिक आधार दिल्याने त्याचे आयुष्य वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 22:16 IST

व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याशिवाय इतर खबरदारी घेतल्यास बाधित व्यक्तीला मदत करता येते. रोगाचा प्रसार टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी निरोधचा वापर केल्याने एड्स धोका पूर्णत: टाळता येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एचआयव्ही व एड्स या रोगाचा संसर्ग वाढतो आहे. बाधितांमध्ये अपराधाची भावना निर्माण होऊ नये यासाठी बाधितांना धीर देण्याची गरज आहे. यातून ते सामान्य जीवन सहज जगू शकतात. शासनाकडून सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार मिळतो. योग्य आहार, विहार व नियमित औषधी या आधारावर बाधित व्यक्ती सर्वसामान्यांसारखे जीवन व्यतीत करू शकते.व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. याशिवाय इतर खबरदारी घेतल्यास बाधित व्यक्तीला मदत करता येते.

५३,५२० जणांची तपासणी झाली गत सहा महिन्यांत५३ हजार ५२० सामान्य रुग्णांची एचआयव्ही तपासणी जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तीन एआरटी सेंटर कार्यान्वित आहेत.

याद्वारे पसरू शकतो एड्‌स

रोगाचा प्रसार टाळण्यासाठी लैंगिक संबंध टाळणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी निरोधचा वापर केल्याने एड्स धोका पूर्णत: टाळता येतो.याशिवाय रक्त घटक किंवा रक्त रुग्णाला देण्यापूर्वी त्याची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. बाधित रक्त दिल्यास संसर्गाचा धोका आहे.

२४७ एचआयव्ही बाधित आढळलेसहा महिन्यांत जिल्ह्यात एचआयव्हीचे २४७ नवीन बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.६१५९ बाधितांवर होतोय उपचारएआरटी सेंटर व शासकीय रुग्णालयात ६ हजार १५९ बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

७ अल्पवयीन मुलेही बाधितएचआयव्ही संसर्गाचा विळखा आता अल्पवयीन मुलांपर्यंतही पोहोचला आहे. हा आजार हळूहळू पसरत आहे. याला प्रतिबंध हाच यावरचा प्रमुख उपचार आहे. त्यामुळे एडस् होऊ नये यासाठीची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करावा. तपासणी झालेल्या रुग्णांमध्ये ७ अल्पवयीन मुले पाॅझिटिव्ह आली आहेत.

वाळीत टाकू नका, गळाभेट घ्या...एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्याच्यासोबत राहिल्यास, सहवासात असल्यास कुठलाही धोका होत नाही. या उलट आजाराच्या काळात अशा बाधित व्यक्तीला सोबत राहून मानसिक आधार, धीर दिल्यास तो लवकर त्यातून बरा होऊ शकतो. आजार नियंत्रणात राहू शकतो.

आरोग्य शिक्षण हाच एकमेव मार्गएचआयव्ही व एड्स यावर लस उपलब्ध नाही. प्रतिबंध हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठी आरोग्य शिक्षण महत्त्वाचा मार्ग आहे. जनतेला एड्सबाबत अद्ययावत माहिती देऊन जनजागृती करता येते व रोगाचा प्रसार टाळता येतो.- डाॅ. प्रीती दास, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी

 

टॅग्स :HIV-AIDSएड्स