शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भगवान महावीरांच्या जयघोषात अहिंसेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:04 IST

‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला.

ठळक मुद्देविविध कार्यक्रम : ध्वजारोहण, प्रभातफेरी

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : ‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला. तर अहिंसा संदेश रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जैन धर्मीयांचे चोविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जैन संघटनेच्या वतीने सकाळी ६ वाजता माळीपुरातील दिगंबर जैन मंदिरात मंगल ध्वजारोहण करण्यात आले. सात वाजता भगवान महावीरांच्या तैलचित्रासह दिगंबर जैन मंदिरापासून प्रभातफेरी निघाली. गांधी चौक, हनुमान आखाडा चौक, पाच कंदिल चौक, येरावार चौक, पोस्टल ग्राउंड, पुनम चौक, स्टेट बँक चौक, धामणगाव रोड अशा मार्गाने मार्गक्रमण करीत श्रीमत रामचंद्र ज्ञानमंदिर येथे ही प्रभातफेरी विसर्जित झाली. प्रभातफेरीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष परंपरागत वेशभूषेत सहभागी झाले होते. धर्मध्वजा घेऊन भगवान महावीरांचा जयघोष करीत निघालेल्या या फेरीने यवतमाळ दुमदुमले.जैन सेवा समितीतर्फे आराधना भवन येथे जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती. बोरा जैन धर्म स्थानक येथून ‘जिओ और जिने दो’ असा घोष करीत दुचाकीवर ‘अहिंसा संदेश रॅली’ काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी धर्मध्वजा दाखवून अहिंसा रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली वाघापूर येथील जैन छात्रालयात विसर्जित करण्यात आली. के. सी. बरलोटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय रुग्णालयात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. दहा वर्षावरील युवतींसाठी बरलोटा नर्सिंग होम येथे रुबेला व्हॅसिंग शिबिराचे आयोजन केले होते.भारतीय जैन संघटना व सकल जैन समाजाच्या वतीने महावीर जन्म कल्याण उत्सव साजरा करण्यात आला. यशस्वितेसाठी डॉ. रमेश खिवसरा, उमेश बैद, ललित जैन, आदेश लुणावत, राजेंद्र गलेडा, आनंद चौधरी, प्रवीण बोरा, कस्तुर सेठिया, अनिल ओसवाल, गौतम कटारिया, प्रमोद मुथा, अ‍ॅड. विवेक बरलोटा, संजय झांबड, सुनिल भरुट, राजेश गुगलिया, अशोक कोठारी, ललित, संतोष कोचर, सेटीया, विजय बुंदेला, रवी बोरा, मयुर मुथा, रवींद्र कोठारी, तिलक गुगलिया, अमर गुगलिया, गौतम खाबिया, श्याम भंसाली आदींसह सकल जैन समाजातील सर्वांचे सहकार्य लाभले.पाणपोईचे उद्घाटनयवतमाळ शहरात उष्णतामान वाढत असताना पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त स्टेट बँक चौकात पाणपोई लावण्यात आली. त्याचे उद्घाटन स्वाध्याय संघाचे अध्यक्ष अमरचंद गुगलिया, जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, राजेंद्र गेलेडा, डॉ. पियूष बरलोटा, प्रवीण बोरा, संजय झांबड आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. महिला मंडळातर्फे केसरिया भवनात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी देतानाच गोरगरीब रुग्णांना दिलासा देऊन भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८