शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:39 IST

गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देमारेगाव तालुका : दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर येत्या एका वर्षात मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांचे सिंचन वाढवून उत्पन्नात वाढ करू, असे हिरवे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने दाखविले. वीज मंडळाकडून तत्काळ वीज जोडणी मिळणार, या आशेवर तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांनी सन २०१६ मध्ये वीज वितरण कंपनीकडे कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले होते. परंतु या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून कृषी पंपाची वीज जोडणी मिळाली नाही. यासंदर्भात अनेकदा शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात चकरा मारून साहेब जोडणी कधी मिळणार, याची चौकशी केली. परंतु वेळोवेळी कार्यालयाती कर्मचाऱ्यांनी वरून आदेश नाही, टेंडर मिळाले नाही, मार्चपर्यंत टेंडर निघणार, असे मोघम स्वरूपातील उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मार्च संपला तरी वीज कंपनीने कृषी पंपाचे टेंडर अजुनपर्यंत काढले नसल्याची माहिती वीज कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे स्वप्न हवेतच विरण्याची चिन्हे असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गेल्या दोन वर्षापासून रखडलेले कृषी पंपाची वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.