शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

आजंतीत लग्नानंतर ‘शतकी’ वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:04 IST

पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र तालुक्यातील आजंती या खेड्यात नव वरवधूने चक्क आपल्या ....

नवदाम्पत्याचा पुढाकार : गावात ठिकठिकाणी लावली १०० झाडेकिशोर वंजारी । लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र तालुक्यातील आजंती या खेड्यात नव वरवधूने चक्क आपल्या लग्नात १०० वृक्षांची लागवड करून मगच गृहप्रवेश केला. वैयक्तिक समारंभाला त्यांनी दिलेला सामाजिक स्पर्श चर्चेचा विषय ठरला आहे.वृक्ष लावा, सृष्टी जगवा, अशी हाक देत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. त्याच वेळी चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका शिला गोपाळसिंह चौहाण यांनी त्यांचे पुतणे संग्रामसिंह प्रेमसिंह चौहाण यांच्या विवाहनिमित्तही वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम राबविला. हा विवाह नेर तालुक्यातील आजंती येथे नुकताच पार पडला. विवाहानंतर नवदाम्पत्य संग्रामसिंह व पूजा यांच्या हस्ते गृहप्रवेशापूर्वी वृक्षलागवड करण्यात आली. आजंती येथील अनेक प्रशस्त व मोक्याच्या ठिकाणी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत १०० झाडे लावण्यात आली. नगरसेविका चौहाण यांनी गावभर कॉर्नर सभा घेऊन जनजागृती केली. वनविभागामार्फ वृक्ष उपलब्ध करून देत नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुंड, वनपाल शिरभाते, वनरक्षक राऊत, वनमजूर अशोक कदम, प्रेमसिंह ठाकूर, सरपंच सीमा राठोड, सचिव धुर्वे, तलाठी राऊत यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सुरेश पुनसे, विठ्ठलसिंह ठाकूर, सुनिल श्रृंगारे, श्याम चव्हाण, मंगेश अवघड, रेश्मा व साक्षी ठाकूर, आरती तोमर, अशोक पवार, गणेश राठोड, किसन पवार, गौरव साहील, गजेंद्रसिंह आदींनी योगदान दिले. वृक्षारोपणासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असताना अशा वृक्षारोपणाने त्याला प्रोत्साहन मिळत आहे.