शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सर्जिकल स्ट्राईकनंतर सामान्यांचे पाकिस्तानवर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:37 IST

‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते.

ठळक मुद्देयवतमाळकरांचा आवाज गरजला : ‘भारत माता की जय’, सबूत देऊनई मानत नाई... आता घे म्हणा शेक्कून

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते. तरी पाकिस्तान मने का कसाबले आमी धाडलंच नाई. आता सबूत गिबूत नाई बाबू. डायरेक बदलाच. घे शेक्कून!’ हे शब्द आहेत रस्त्यावर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या सर्वसामान्य यवतमाळकर माणसाचे अन् पाकिस्तानवर खवळलेल्या सर्वसामान्य भारतीयाचे.मंगळवारी पहाटेच्या वेळेस भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मिरात ४४ भारतीय जवानांच्या पाठीवर वार केला होता. त्या भेकड हल्ल्याने भारतीय जनमानस अस्वस्थ होते. पण मंगळवारी भारतीय जवानांनी ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडून ‘सूतसमेत’ वसुली केली. या सर्जिकल स्ट्राईकची खबर कळताच यवतमाळात भारतीय जवानांबद्दलचा अभिमान दाटून आला. रस्त्यावर राबणारे, हातगाडी चालविणारे, शेतात घाम गाळणारे असे सारेच आनंदून गेले. महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये तर पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दणाणले आणि ‘भारत माता की जय’ असा गगनभेदी जयजयकार झाला.गोली के बदले गोली, हेच बरोबरदहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या कारवाईबाबत मुख्य बाजारपेठेत चहाटपरी चालविणारा व्यावसायिक म्हणाला, ‘त्यायले तं पह्यलेच उडवाले पाह्यजे होतं साल्यायले. कवाचे तरास देऊन राह्यले आपल्या भारताले.’ दाते महाविद्यालयाच्या परिसरात जमलेले बिकॉमचे विद्यार्थी म्हणाले, ‘एका गालावर मारलं तं दुसरा गाल पुढे करायचा, हे आता जमत नाही. महात्मा गांधीजींचा काळ वेगळा होता. आता प्रेमानं चर्चा करतो म्हटलं तर पाकिस्तान ऐकतच नाही. गोली के बदले गोली, हेच बरोबर झालं.’ तर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुण म्हणाले, ‘पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, हे आता सिद्ध झाले आहे. तेथील दहशतवाद्यांनी आपल्या जवानांना मारले, ते साऱ्या जगाने पाहिले, तरी पाकिस्तानची मग्रूरी संपत नाही. आज भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर बॉम्ब टाकले ते बरेच झाले. पाकिस्तानच्या मनातही धाक निर्माण झाला पाहिजे, की भारत काहीही करू शकतो.’पाक जनतेचाही दहशतवाद्यांना सपोर्टबसस्थानक परिसरातील व्यावसायिक म्हणाले, पाकिस्तानच्या जनतेचीही यात चूक आहे. तेथील लोक दहशतवाद्यांना सपोर्ट करतात. इतर देशांमध्ये आर्मीला खूप प्राधान्य दिले जाते. आपल्या देशातही तसे व्हायला पाहिजे. तर एक आॅटोचालक म्हणाला, ‘मी तं काई टीव्ही पाह्यली नाई. पण पाकिस्तानले झोडपलं आसन तं बरंच झालं.’...तरीही संयम कायमसर्वसामान्य भारतीयांनी सर्जिकल स्ट्राईकवर आनंद व्यक्त केला. मात्र हा आनंद व्यक्त करतानाही संयम राखणाºया प्रतिक्रिया उमटल्या. गोधनी रोडवर उसाचा रस विकणारा व्यावसायिक म्हणाला, ‘आपली दुश्मनी आतंकवाद्यांसोबत हाये. पाकिस्तानच्या जनतेनं आपलं काही घोडं मारलं नाई. तिथं आपलेच भाऊ बहीण हाये. हमले करणाºयायचा जो काही वाद हाये थो निपटवला पाहिजे अन् दोन्ही देशातले लोक सेफ राहिले पाहिजे.’ असाच काहीसा संयमी सूर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुणींनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘आपले सैन्य कोणत्याही कार्यवाहीसाठी सक्षम आहे. पण आजवर आपण चर्चेनेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुटत नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली. काहीही असो, युद्ध मात्र दोन्ही देशांना परवडणारे नाही.’तरुणी म्हणाल्या, अ‍ॅक्शन आवश्यकचभारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जसे सारे तरुण खूश झाले, तशा महिला आणि तरुणींमध्येही आनंदाची लाट आली. तरुणी म्हणाल्या, ‘पाकिस्तानविरुद्ध अशा अ‍ॅक्शन घेतल्याच पाहिजे. तेथील टेरर कॅम्पवर भारताने बॉम्ब टाकून धाक निर्माण केला आहे. पण आता आपल्या सरकारने असा काही निर्णय घेतला पाहिजे, पाकिस्तानची समस्या कायमचीच संपली पाहिजे. नाहीतर पुन्हा एखाद दुसरा आतंकवादी भारतात येत राहील आणि लपून छपून हल्ले करत राहील.’