शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाही झुगारुन शवयात्रा काढलीच

By admin | Updated: July 15, 2017 02:22 IST

सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी प्रचंड दडपशाही आणि कार्यकर्त्यांची धरपकड करूनही

शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी : कार्यकर्त्यांची रात्रीपासूनच जिल्हाभर धरपकड, बच्चू कडूंचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी प्रचंड दडपशाही आणि कार्यकर्त्यांची धरपकड करूनही शेतकरी आंदोलकांनी अखेर सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढलीच. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकऱ्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडली नाही. उलट वेगवेगळे व जाचक निकष लावून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या अर्ध्या अधिक शेतकऱ्यांना या माफीपासून वंचित ठेवले गेले. सरकारची ही घोषणा फसवी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी ‘सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हाभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. दरम्यान हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी पोलीस व प्रशासनाला हाताशी धरुन पुरेपूर प्रयत्न केले. आंदोलन करा, मात्र शवयात्रा काढू नका, असा प्रस्ताव आंदोलकांपुढे ठेवला गेला. मात्र हा प्रस्ताव झुगारण्यात आला. म्हणून या आंदोलनात सहभागी होऊ शकणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांची रात्रीपासूनच धरपकड सुरू करण्यात आली. पहाटेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात शेतकरी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. शहराबाहेरील सर्व मार्गांवर वाहनांची तपासणी करून कार्यकर्त्यांना तेथेच ताब्यात घेतले जात होते. पोलिसांनी अखेरपर्यंत तिरडी निघू नये यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची शोधाशोध केली. परंतु पोलिसांची ही दडपशाही झुगारुन गनिमीकाव्याने आधी उमरसरा व नंतर येथील जयहिंद चौकात सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांचे प्रयत्न फेल ठरले. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे प्रहार युवा शक्ती संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू चक्क मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने यवतमाळ बसस्थानकावर पोहोचले. तेथून दुचाकीने त्यांनी शासकीय विश्रामगृह गाठले. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, आंदोलनाचे निमंत्रक देवानंद पवार आदी तेथे पोहोचले होते. कार्यकर्त्यांचीही तेथे प्रचंड गर्दी झाली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शवयात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे तिरडी व साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी शवयात्रेचा निर्धार कायम ठेवत चौघांनी एका कार्यकर्त्याला प्रेतयात्रेसारखे उचलून काही अंतर चालले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेत्यांनी युती सरकार, जिल्हा प्रशासन, आंदोलनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे वयोवृद्ध नेते, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख, पोलीस आदींचा खरपूस समाचार घेतला. या आंदोलनासाठी यवतमाळ शहर व जिल्हाभरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, शेतकरी संघटनेचे विजय विल्हेकर, गजानन अहमदाबादकर, माजी आमदार विजयाताई धोटे, वामनराव कासावार, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, मनीष पाटील, प्रफुल्ल मानकर, बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, स्वामिनीचे महेश पवार, मनिषा काटे आदी सहभागी झाले होते. पुढील आंदोलने भगतसिंगांच्या मार्गाने - बच्चू कडू ४शासकीय विश्रामगृहाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने शांततेने आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु सत्ताधारी नेते, पोलीस व प्रशासनाने कार्यकर्त्यांची आधीच धरपकड करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्ह आणि ब्रिटीश राजवटीला लाजविणारा आहे. त्यामुळेच यापुढे शहीद भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलने केली जातील. थेट पालकमंत्र्यांच्या घराला निशाणा बनविले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आमदार बच्चू कडू यांच्या दमदार व सडेतोड भाषणामुळे उपस्थितांमध्ये जोश संचारला होता. विश्रामगृहावर आंदोलकांनी जीवंत कार्यकर्त्याला खांद्यावर उचलून शवयात्रा काढत सर्वांचे लक्ष वेधले. पोलिसांदेखत आंदोलकांनी तिरडीवर सरकारचा प्रतिकात्मक मृतदेह ठेऊन समोर आगटे धरुन शवयात्रा काढली.