शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत खुनाच्या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:42 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देबाजारपेठ बंद : निलेशवर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात उभी असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावरील हल्ल्यानंतर ही घटना घडल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.शहरात शुक्रवारी भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर व्याजाच्या पैशाच्या वादातून हल्ला झाला. गंंभीर जखमी अवस्थेत मस्के यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी लगेच बाजारपेठही बंद झाली होती. दरम्यान मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणातील रुग्णवाहिका पेटवून दिली. यात रुग्णवाहिका खाक झाली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.मृतक भाजपा कार्यकर्ता निलेश मस्के यांच्यावर शनिवारी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक व विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी होती. दरम्यान रुग्णवाहिका जाळल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयातर्फे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यात पाच जणांच्या नावाचा उल्लेख आहे. रुग्णवाहिका जाळणारे रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. निलेश मस्के यांच्या मृत्यूमुळे शहरात दुसऱ्या दिवशीही तणाव कायम होता. बाजारपेठ कडकडीत बंद होती. 

टॅग्स :Murderखून