शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शाळाबंदीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:04 IST

पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेने तब्बल ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर बदलीची तर शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणच तुटण्याची वेळ आली होती. अखेर प्रचंड विरोध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी ८१ पैकी ५९ शाळा बंद करण्याच्या जिल्हा परिषदेच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा आदेश : पाठपुराव्याने जिल्हा परिषदेला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेने तब्बल ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर बदलीची तर शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणच तुटण्याची वेळ आली होती. अखेर प्रचंड विरोध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी ८१ पैकी ५९ शाळा बंद करण्याच्या जिल्हा परिषदेच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने २ मे रोजी जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करून इतरत्र समायोजन करण्याचा निर्णय घेतला होता. यात ५० प्राथमिक तर ३१ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश होता. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविला. मात्र शिक्षक, पदाधिकाऱ्यांच्या, शाळा व्यवस्थापन समितीच्या, गावकºयांच्या विरोधानंतरही शिक्षण विभागाने प्रत्यक्ष समायोजनही सुरू केले होते.अखेर सर्व शिक्षक संघटनांच्या महासंघाने या संदर्भात अमरावती येथे विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तर त्याच वेळी सोमवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीतही शाळाबंदीच्या निर्णयावर स्थगिती आणण्याचा ठराव घेण्यात आला. शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालिंदा पवार, प्रीती काकडे, लताबाई कठाळे, मधुकर काठोळे यांनी हा ठराव घेतला. बैठकीनंतर समिती सदस्यांनी लगेच सीईओंची भेट घेऊन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आता ८१ पैकी ५९ शाळा पूर्ववत सुरू राहणार आहे.पटसंख्येचा निकष चुकलाविभागीय आयुक्तांनी या शाळांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल मागितला होता. या अहवालानुसार ८१ पैकी पहिली ते पाचवीच्या नऊ आणि सहावी ते आठवीच्या १३ शाळांमधील पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे. त्यामुळे या २२ शाळा समायोजित करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. मात्र उर्वरित ५९ शाळांमधील पटसंख्या दहा पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या शाळांचे समायोजन शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशानुसार झालेले नाही, असा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी या शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याचा आदेश मंगळवारी सीईओंना दिला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण