शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १७ परिचारिकांना केले कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:23 IST

येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आता ९१ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देअधिष्ठातांना घेराव : निवृत्त परिचारिकेने चिखलफेक केल्याने रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आता ९१ वर पोहोचला आहे. याचा परिणाम थेट गरीब रुग्णांवर होणार आहे. या दोन्ही संघटनांनी आपली प्रतिष्ठा दाखविण्यासाठी थेट आंदोलन उभे केले.परिचारिकांच्या कार्यमुक्तीसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने बेमुदत उपोषण सुरू केले होते. तर सोमवारी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनेही (मुख्यालय लातूर) परिचारिकांच्या कार्यमुक्तीसाठी अधिष्ठातांना घेराव घातला. यामुळे रुग्णांच्या हिताविरोधात जाणारा निर्णय अधिष्ठातांना घ्यावा लागला. या प्रकरणामध्ये संचालकांनी सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नऊ परिचारिकांना २५ जानेवारीला कार्यमुक्त करण्यात आले. याच मुद्याला घेऊन उपोषणाला बसलेल्या संघटना पदाधिकाऱ्यांनी खालच्या पातळीवरचे आरोप केले. त्यानंतर सोमवारी दुसºया संघटनेने अधिष्ठातांना घेराव घातला. प्रकरण चिघळत असल्याने १७ परिचारिकांना कार्यमुक्त केले. यामुळे रुग्णालयातील रिक्तपदांत आणखी भर पडली आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची भीती आहे.अधिष्ठातांना ‘टार्गेट’ केल्याचा आरोपखडसे या सेवानिवृत्त आहे. त्या वैद्यकीय महाविद्यालयात शिरून वातावरण बिघडवितात. यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आता त्यांनी अधिष्ठातांना टार्गेट केले. हे चुकीचे आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केला आहे. यावेळी घेराव करताना संघटनेच्या अध्यक्ष मंगला ठाकरे, सचिव सुरेखा मदनकर, कोषाध्यक्ष वंदना मकेश्वर, कार्याध्यक्ष नंदा वरकड, सदस्य अलका डखरे, विमल भवरे, सुरेश मदनकर, परमेश्वर चव्हाण, विनोद दामले, रंजना सुरूशे उपस्थित होत्या.वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकांचा तुटवडा आहे. अशात संघटनेकडून कार्यमुक्तीचा रेटा वाढला आहे. संचालकांचे आदेश आहे. यामुळे १७ परिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आले.- डॉ. मनीष श्रीगिरीवार,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ