शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
5
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
6
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
7
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
8
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
9
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
10
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
11
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
12
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
13
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
14
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
15
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
16
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
17
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
18
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
19
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
20
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष पुरके यांच्या निर्णयाकडे

By admin | Updated: May 21, 2016 02:30 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले ....

भाजपही डाव साधण्याच्या तयारीत : राळेगाव बाजार समिती निवडणूकराळेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचे कार्यकर्तेही डाव साधण्याच्या तयारीत आहे. राळेगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांची पकड आहे. १९९९ ते २००४ या पंचवार्षिकनंतर पुढे सन २०१० ते आजतागायत ते बाजार समितीचे सभापती आहेत. जोडीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. बाजार समिती स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचे प्रयत्न या वेळीही सुरू आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीचा प्रवास दोन वर्षात पूर्ण करून घरवापसी झाल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकीत पक्षाची ताकद वाढण्याऐवजी घटल्यामुळे कार्यकर्ते काँग्रेसच्या भविष्याप्रती चिंतीत झाले आहे. त्यामुळे प्रा. पुरके यावेळी प्रफुल्ल मानकर, काँग्रेस कार्यकर्ते व दोन्हीबाबत नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे काँग्रेसजणांचे लक्ष लागले आहे.प्रा. पुरके यावेळी जो काही निर्णय घेईल त्याचा परिणाम बाजार समितीच्या निवडणुकीवर होईलच, पण त्यापेक्षा अधिक परिणाम आगामी काळात काँग्रेस पक्षावर व २०१९ मध्ये ते लढणार असलेल्या विधानसभा निवडणुकीवरही निश्चित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला या निवडणुकीत अत्याधिक महत्त्व आले आहे. पुढील काळात अवघ्या सहा महिन्यांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, वसंत सहकारी जिनिंग, सहकारी बँक आदींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहे. यावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या वाढत जात असलेल्या प्रभावाचा सामना करण्याकरिता प्रा. पुरके यांच्या बाजार समिती संदर्भातील निर्णयाला अत्याधिक महत्त्व आले आहे. एक व्यक्ती, एक पद की अनेक पदाबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी बाजार समितीचा कार्यकाळ संपला. पण, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी वेळीच हालचाली करून त्यावर प्रशासक बसविण्यात ते असमर्थ राहिले. बाजार समितीसंदर्भातील वेळोवेळी चर्चित राहिलेले विविध प्रकार, गैरप्रकारावर वेळोवेळी लक्ष घालून कारवाई, चौकशा करविण्यात आल्या नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज राहिले होते. पण आता बदललेल्या परिस्थितीत आमदार उईके यांनी सुरू केलेली कामे आणि होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये संधीचा लाभ उचलण्यासाठी भाजपनेही गंभीरपणे प्रयत्न सुरू केले आहे. मतदारयादीवरच तब्बल ११ आक्षेप दाखल करून त्यांनी गंभीरतेची चुणूक दाखविली. निर्णयात आक्षेप फेटाळले गेले असले तरी भाजप किती आक्रमक होत आहे, हे दिसून येत आहे. सेनेच्या ताब्यातही काही ग्रामपंचायती आहेत. या पक्षाचे पदाधिकारी वाशिम-यवतमाळच्या निर्देशानुसार काम करतात की स्थानिकस्तरावर त्याबाबत निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. या संस्थेच्या निवडणुकीकडे तालुक्यातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)