शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

कौतुकास्पद! काळीपिवळी चालकाचा मुलगा यूपीएससीत उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:50 IST

यवतमाळच्या काळीपिवळी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने देशातून ३१५ वी रँक मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे.

ठळक मुद्दे स्वकमाईच्या बळावर दिल्लीत केली तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरीब घरात गुणवत्ता जन्माला आली की, जिंकण्याची जिद्द अधिक धारदार बनते. कष्टाच्या पायऱ्या चढत यशाचा कळसही हाताला लागतोच. याच सूत्रानुसार यवतमाळच्या काळीपिवळी चालकाचा मुलगा अझहर काझी आता आयएएस अधिकारी होणार आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने देशातून ३१५ वी रँक मिळवून आपली पात्रता सिद्ध केली आहे.

येथील रचना कॉलनीत राहणारे काझी कुटुंबीय गरिबीतही समाधानाने जगणारे. झहीरुद्दीन काळीपिवळी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना अझहरसह झुबेर, उमेर आणि साकीब अशी चार मुले. अझहरने घरातल्या गरिबीवर मात करीत येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालयातून २००६ मध्ये बारावी उत्तीर्ण केली होती. तेव्हाही तो वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिला आला होता.

त्यावेळचे यवतमाळचे पोलीस अधीक्षक अब्दूल रहमान यांच्यामुळे आपणही आयपीएस बनावे, अशी प्रेरणा अझहरला मिळाली. मात्र घरच्या परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेसाठी वेळ देणे शक्य नसल्याने त्याने बँकिंग परीक्षांची तयारी केली. २०१२ मध्ये तो पीओ परीक्षा उत्तीर्ण होऊन कापोर्रेशन बँकेत नोकरीत लागला. त्यातही प्रगती करीत त्याने बंगळूरू, नागपूर आणि नंतर यवतमाळ येथे ब्रँच हेड म्हणून काम केले.आता घरातील परिस्थिती सुधारली होती. लहान भाऊदेखिल कमावते झाले होते. म्हणून २०१८ मध्ये त्यांनी बँकेची नोकरी सोडून यूपीएससीच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थेट दिल्ली गाठून तेथील जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत निवासी प्रशिक्षण अकादमीत प्रवेश घेतला. आता दुसºया प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाले आहेत.धाकटा भाऊही नोकरी सोडून दिल्लीतअझहर काझी यांनी बँकेतील नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता त्यांचे लहान भाऊ डॉ. उमेर काझी हेही दिल्लीत गेले आहे. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये असलेली नोकरी सोडून ते यूपीएससीच्या तयारीसाठी ते फेब्रुवारी महिन्यात जॅमिया हमदर्द युनिव्हर्सिटीत गेले आहेत. तर सर्वात लहान भाऊ अ‍ॅड. साकीब राजा वकिली करीत आहेत.आईवडिलांना गगन ठेंगणेप्रतिकूल परिस्थितीत अझहरचे भविष्य घडविणारे त्याचे आईवडिल मिराज आणि झहीरुद्दीन काझी यांच्या आनंदाला मंगळवारी पारावार उरला नाही. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या या दाम्पत्याचा एक मुलगा आता आयएएस होणार आहे. दुसराही तयारी करीत आहे. तर तिसरा वकील म्हणून नावलौकिक करीत आहे.मला यूपीएसीच्या मुलाखतीमध्ये यवतमाळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अब्दूर रहमान आणि विद्यमान अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. आयएएस होऊन समाजाची सेवा करावी, हे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.- अझहर काझी, यवतमाळ

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग