शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी नागरिक मात्र या विषयात कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वणीची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तीद्वारे ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा व्यक्तींवर प्रशासन वॉच ठेवून आहे.मागील आठवड्यात दुबई येथून वणीत आलेल्या एका वृद्धेमुळे प्रशासनाच्या उरात धडकी भरली होती. माहिती मिळताच, आरोग्य यंत्रणेने तातडीने सदर वृद्धेचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला. सुदैवाने मंगळवारी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला. वणी शहरातील अनेकजण परदेशगमन करतात. काहीजण शिक्षणाच्या निमित्ताने, तर काहीजण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांची वणीत ये-जा सुरू असते. कोरोनाची दुसरी लाट शमण्याच्या मार्गावर असताना देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी नागरिक मात्र या विषयात कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. शासकीय कार्यालयांमध्ये मात्र नो-मास्क, नो-एंट्रीचे फलक झळकत असल्याने व मास्कशिवाय प्रवेशच दिला जात नसल्याने नागरिक संबंधित कार्यालयात काम असेल तेव्हा मास्क लावून आतमध्ये प्रवेश करतात. बाहेर निघाल्यानंतर मात्र तोंडावरील मास्क काढला जातो. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना हळूहळू पाय पसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा अतिशय वेगाने प्रसार होत असल्याने नागरिकांकडून काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र कोरोना संपला, या आविर्भावात वणी शहरात नागरिक फिरताना दिसत आहेत. वणीच्या बाजारपेठेत रोज तोबा गर्दी असते.

वणीच्या विठ्ठलवाडीत कोरोनोचे ३ सक्रिय रुग्ण- मागील काही महिने वणीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील विठ्ठलवाडीत ५ डिसेंबरला एक, तर ६ डिसेंबरला कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे.

ओमायक्रॉन हा व्हेरीएंट वेगाने पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. - डॉ.अमित शेंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन