शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

प्रशासन लागले विधान परिषदेच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प्रा. तानाजी सहज विजयी झाले होते.

ठळक मुद्देनिवडणूक कार्यक्रम लवकरच : मतदार याद्या ‘अपडेट’चे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी अद्यावत करण्याचे आदेश शुक्रवारी येथील निवडणूक विभागात धडकले.शिवसेनेचे प्रा. तानाजी सावंत हे तीन वर्षांपूर्वी यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून गेले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे यवतमाळची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतचे सदस्य तसेच १६ ही पंचायत समित्यांचे सभापती या निवडणुकीत मतदार असतात. त्यांची यादी अपडेट करून कुण्या पक्षाचे किती मतदार आहेत, याची माहिती निवडणूक विभागाला मुंबईतून मागण्यात आली आहे. ते पाहता पुढील दोन आठवड्यात या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.विधान परिषदेच्या या जागेसाठी प्रा. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची आॅफर देण्यात आली आहे. यापूर्वी प्रा. तानाजी सहज विजयी झाले होते. आता तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने शिवसेनेकडून कोणत्याही उमेदवाराचा विजय आणखी सूकर झाल्याचे मानले जाते. हीच महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही कायम राहणार असल्याने आगामी अध्यक्ष शिवसेनेचा, उपाध्यक्ष काँग्रेसचा तर दोन सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे असे नवे समीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय सहज सोपा होऊ शकतो.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदच नव्हे तर दिग्रस विधानसभेतूनही लढण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातून विधान परिषद अथवा विधानसभेचे प्रतिनिधीत्व स्वीकारल्यास जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.- तर जिल्ह्याचा झपाट्याने विकासशेतकऱ्यांना दिलासादायक ठरणारे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल झोन, विविध एमआयडीसीमध्ये उद्योगांची स्थापना, रखडलेले रेल्वे, सिंचन व दळणवळणाचे प्रकल्प, यवतमाळातील नाट्यगृह, ३०२ कोटींची अमृत योजना आदी कामे वेगाने मार्गी लागू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून लढण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी दिलेल्या आॅफरचे शिवसेनेतून स्वागत होत आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद