शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बजेट विनियोगासाठी अतिरिक्त जबाबदारी

By admin | Updated: February 5, 2016 01:58 IST

जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून विविध शिर्षांतर्गत विकास निधी मिळतो. हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे.

जिल्हा परिषद : साडेआठ कोटींचे आव्हानयवतमाळ : जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून विविध शिर्षांतर्गत विकास निधी मिळतो. हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. अपवादात्मक स्थितीत निधी खर्चासाठी अवधी वाढवून दिला जातो. दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आर्थिक वर्षातील बजेट खर्च करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांवर तालुकानिहाय अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आर्थिक वर्षात विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी त्याच वर्षात अपवादानेच १०० टक्के खर्च होतो. बरेचदा हा निधी प्रक्रियेत अडकून ठेवला जातो. नियोजन समितीकडून आरोग्य विभागाला प्राप्त झालेला निधी १०० टक्के खर्च झाला. मात्र रस्त्याच्या कामासाठी आलेला ३०-५४ चा निधी अद्यापही खर्च झाला नाही. याशिवाय जनसुविधेच्या कामासाठी आलेले २५ कोटी ५० लाख अखर्चित आहेत. यातून ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी शेड बांधकाम अपेक्षित आहे. हा निधी खर्च करण्यासाठी एक वर्षाची वाढीव मुदत मिळणार आहे. त्याकरिता साडेआठ कोटी मार्च अखेरपर्यंत खर्च करावे लागणार आहे. यासाठीच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विभाग प्रमुखांकडे तालुक्यांची जबाबदारी सोपविली. त्याचा दैनिक आढावा गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. आर्णी व कळंब तालुका सीईओ कलशेट्टी, महागाव, उमरखेड अपर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, मारेगाव, राळेगाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी भावसार, पुसद, दिग्रस, दारव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, यवतमाळ, नेर अरुण मोहोड, पांढरकवडा, झरी प्रकल्प अधिकारी विनय ठमके तर बाभूळगाव, वणी या तालुक्यांची जबाबदारी राजेश गायनार यांच्याकडे सोपविली आहे. हे सर्व विभाग प्रमुख दिवसातून एकदा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांशी वार्षिक खर्चाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहेत. यात जनसुविधेची कामे, इंदिरा आवास योजनेतील घरकूल, शौचालय निर्मिती आणि रोहयोतील धडक सिंचन विहिरींच्या कामांचा समावेश राहणार आहे. सीईओंनी प्रशासकीय गती वाढविण्यासाठी लढविलेली शक्कल कितपत यशस्वी ठरते हे मार्च अखेर दिसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)