शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

स्वत:सोबतच इतरांना ‘बि’ घडविण्याचा ‘प्रयास’

By admin | Updated: March 27, 2015 01:39 IST

माणसाची प्रतिभा नकारात्मक परिस्थितीतच अधिक फुलते. संकटांचे रस्ते तुडवित यशाचे शिखर गाठले जाते.

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ यवतमाळ : माणसाची प्रतिभा नकारात्मक परिस्थितीतच अधिक फुलते. संकटांचे रस्ते तुडवित यशाचे शिखर गाठले जाते. अशाच यशाचे शिखर गाठणाऱ्या जिगरबाज माणसांच्या संघर्षाचा पट यवतमाळकरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १२ कार्यक्रमातून अनुभवला. पराभूत मानसिकतेतून माणसांना बाहेर काढण्याचा हा प्रयत्न म्हणजे ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ ही संवाद मालिका होय. स्वत:सोबत इतरांंना ‘बि’घडविण्याचा हा ‘प्रयास’ अनेकांच्या आयुष्याला पैलू पाडत आहे. संत तुकारामाचा ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना’ हा अभंग केंद्रस्थानी ठेऊन आतापर्यंत १२ संघर्षशील व्यक्तीमत्वे यवतमाळकरांसमोर आली. यातूनच ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ ही एकमेकांना घडविणारी प्रक्रिया समोर आली. डॉ. अविनाश सावजी नावाचा झपाटलेला एक माणूस. एका निश्चित ध्येयाने वेडा झालेला स्वत:सोबत घडविणारा. गेली २५ वर्ष त्यांचा हा अविरत प्रयास सुरू आहे. पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र या माणसाने पिंजून काढला. अनेकांच्या आयुष्याला पैलू पाडत असताना आता त्याला सामूहिक रुप येऊ लागले. प्रयास-सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रतिभावंतांना समोर आणले. राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांना यवतमाळातून आणून त्यांच्या प्रेरणास्पद मुलाखतीचे आयोजन त्यांनी केले.गतवर्षीच्या १२ एप्रिल रोजी ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमाचे रोपटे यवतमाळात लावण्याचा प्रयास झाला. पाहता पाहता १२ संघर्षशील व्यक्तींनी आपला जीवनपट उलगडून दाखविला. राजेश ठोंबरे या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सर्पमित्राने सर्पदंश झालेल्या हजारो व्यक्तींचे प्राण वाचविले. दहा लाखापेक्षा जास्त लोकांचे सर्पयात्रेद्वारा प्रबोधन केले. २९ वेळा नाग, १९ वेळा मण्यार दंशासहीत एकूण ५५ वेळा विषारी सर्पदंश होऊनही प्रथमोपचार व उपचाराच्या सहाय्याने ते जीवंत आहे. एक पैसाही न घेता गेल्या २२ वर्षांपासून अविरत सुरू आहे. सापाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांचा हा थक्क करणारा जीवनपट यवतमाळकरांनी प्रयासच्या मदतीने अनुभवला. कॅन्सर झालेल्या काही डॉक्टर व रुग्णांची संघर्षगाथा १५ जून २०१४ रोजी अनुभवली, त्यावेळी अंगावर रोमांच उभे राहिले. नागपूरच्या स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. निर्मलाताई वझे, अमरावतीच्या छाया भट्ट, यवतमाळचे जीवतराम कटियारा, डॉ. सुरेश मुडे, शीलाताई कांबळे यांच्या अनुभवाने कॅन्सरग्रस्तांना जगण्याचे बळ दिले. घाटंजीच्या दिलासा संस्थेचे मधुकर धस या वंचितासाठी लढा देणाऱ्याची गाथा अनेकांना प्रेरणा देऊन गेली. ९४५ गावांमध्ये चार हजार महिला बचत गटांद्वारे ४८ हजार महिलांचे संघटन करून एक नवा विक्रमच मधुकर धस यांनी केला. सातारा येथील डॉ.अविनाश पोळ यांचा शंभर गावांचा कायापालट करणारा थरार यवतमाळकरांनी ऐकला. श्रमदानाची बिजे लोकांमध्ये रुजवित हा माणूस गावागावात पोहोचत आहे. यवतमाळचे भूसंपादन अधिकारी राजेश रामराव खवले यांची संघर्ष गाथा आणि इतरांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची धडपड आजही सुरू आहे. या जिगरबाजांची आत्मवृत्ते ऐकून यवतमाळकर भारावलेच नाही तर कामाला लागले. प्रयास संस्थेच्या माध्यमातून आता समाजपयोगी कार्यासाठी ही मंडळी पुढे आली.