शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेवा, शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 21:51 IST

कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग : उठसूट कोर्टात जाणाºयांवर बडगा, बदली प्रकरणे अधिक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतत चर्चेत असतो. मुख्यालयी न राहाणे, वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात बाह्यरूग्ण तपासणी न करणे, सतत तक्रारी करणे, कोणत्याही कारणावरून थेट न्यायालयात धाव घेणे, औद्योगिक न्यायालयातून साध्या विषयांवर स्टे आणणे, आदी बाबींमुळे आरोग्य विभाग जेरीस आला आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी जाणवत आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाºयांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात धाव घेणाºयांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्याच्या निर्णयाप्रत पोहोचला आहे.आरोग्य कर्मचारी बदलीप्रकरणी मोठ्या प्रमाणात न्यायालयात धाव घेतात. बदली, समायोजनातून वाद झाल्याने अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचली आहे. तथापि, न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी कुणीही विभागाची पूर्वपरवानगी घेत नाही. परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करून ते मोकळे होतात. न्यायालयाच्या नोटीसनंतरच ही बाब विभागाला अवगत होते. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतो. वास्तविक न्यायालयात जाण्यापूर्वी संबंधित कर्मचाºयाने संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते, असे सांगण्यात येते. अन्यथा तो सेवा, शिस्तीचा भंग ठरतो. मात्र आत्तापर्यंत याबाबीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही. आता मात्र जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर सेवा, शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीला लागला आहे.कुणीच घेतली नाही परवानगीन्यायालयात जाणाºया जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी विभागाची परवानगी घेतली नाही. त्यांनी थेट न्यायालयात प्रकरण दाखल केले, असे उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या इतरही विभागात आहे. विभागाची अथवा विभाग प्रमुखाची कोणतीही परवानगी न घेता थेट न्यायालयात जाणे म्हणजे सेवा आणि शिस्तीचा भंग असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारला जाण्याचे संकेत आहे.