लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणीच्या विषबाधा प्रकरणी प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबले आहे. कृषी केंद्रांची तपासणी सुरू केली असून पुसद येथे करण्यात आलेल्या तपासणीत तीन केंद्रांत अवैध व विनापरवाना कीटकनाशके विकल्याचे पुढे आले. त्यावरून या तीनही कृषी केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी पी.जी. नाईक, तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड, कृषी अधिकारी शंकर राठोड, मंडळ कृषी अधिकारी के.एस. राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, भाऊ महिंद्रे, भाऊ दीक्षित यांचा समावेश आहे. या पथकाने शहरातील कृषी केंद्रांची तपासणी केली, त्यावेळी दत्त कृषी केंद्र, राजदीप कृषी केंद्र, कन्हैया कृषी केंद्र पुसद यांच्याकडे विनापरवाना विक्रीस ठेवलेले कीटकनाशके आढळून आले. या तीनही कृषी केंद्रावर कृषी साहित्य विक्रीबंदचा आदेश देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड यांनी दिली.या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या व बोगस बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदींची विक्री करणाºया कृषी केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तालुक्यात ही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून झालेल्या विषबाधेने आतापर्यंत १९ जणांचा बळी गेला असून ६०० वर शेतकरी विषबाधित आहे.प्रशासनाने आता दखल घेतली आहे. परंतु यापूर्वीच दखल घेवून कृषी केंद्रांवर कारवाई केली असती तर अनेक शेतकºयांचे प्राण वाचले असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने सुरुवातीपासूनच अशी तत्परता दाखविली असती तर आज ही वेळ आली नसती.संचालकांची बैठककीटकनाशके फवारणीबाधित होणाºया शेतकरी, शेतमजुरांच्या प्रकरणानंतर कृषी विभागाने तातडीने शहरातील कृषी निविष्ठा संचालकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत फवारणीतून विषबाधा होवू नये म्हणून प्रचार व प्रसार करण्याची सूचना देण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या कृषी सहायकांमार्फत ग्रामीण भागात जावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आली. तसेच शेतकºयांना माहितीपत्रके वाटण्यात आली.
पुसदमध्ये कृषी केंद्रांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:31 IST
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणीच्या विषबाधा प्रकरणी प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबले आहे.
पुसदमध्ये कृषी केंद्रांवर कारवाई
ठळक मुद्देकिटकनाशकाचे प्रकरण : कृषी विभागाच्या धाडीत वास्तव उघड