शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

संधीसाठी कौशल्य आत्मसात करा

By admin | Updated: July 18, 2015 02:23 IST

विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, परंतु केवळ कुशलतेचा अभाव असल्याने या संधीचा उपयोग घेता येत नाही.

सचिंद्र प्रताप सिंह : जागतिक युवा कौशल्यदिन साजरायवतमाळ : विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, परंतु केवळ कुशलतेचा अभाव असल्याने या संधीचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कौशल्यपूर्वक ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र्र प्रताप सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, व्यवसास शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एस. व्ही. राठोड, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारच्या सहायक संचालक प्रांजली मशीदकर उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मदतीची आवश्यकता असते. त्यासाठी आवश्यक ते शुल्क द्यावयास संबंधित व्यक्ती तयार असतात. सर्वसामान्यांची गरज लक्षात घेता तशी सेवा पुरविणारे उद्योग सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात केल्यास प्रत्येकास स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. कलशेट्टी यांचेही भाषण झाले.रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविल्याबद्दल अमोल इंडस्ट्रिजचे पांडुरंग खांदवे, रेमंडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव, हिमालय कार सेंटरचे किशोर गोपलानी यांना स्मृतीचिन्ह व वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच रेमंड व औरंगाबाद येथील प्रेस कॉम्पोनंट या कंपनीत नियुक्ती देण्यात आलेल्या युवकांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्यात आशीष पाल, बंडू राठोड, गणेश मेंडके, स्वप्नील पिंपळे, आकाश देशकरी, विशाल करमणकर, धनंजय शिरसागर, भूषण ढोबळे, सागर मोहोड या युवकांचा समावेश आहे.