शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

आजी-माजींची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: May 25, 2016 00:20 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

नवीन समीकरणे : युती, आघाडीत पडली फूट, बुधवारी होणार चिन्ह वाटपवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. विद्यमान आमदारांसह दोन माजी आमदारांना या निवडणुकीत आपले कसब पणाला लावून विजय खेचून आणावा लागेल. त्यासाठी नवीनच राजकीय समीकरण उदयास आले आहे.राज्य आणि देशात भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आहे. मात्र स्थानिक पातळीवर युतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भरकटले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या काही निवडणुकीपासून युतीत कुरबूर आहे. त्यामुळे ‘इंदिरा’च्या निवडणुकीनंतर या मित्र असलेल्या पक्षांतील दुरावा चांगलाच वाढला आहे. ‘इंदिरा’च्या अध्यक्षपदाने ऐनवेळी आमदारांना हुलकावणी दिल्याने सध्या या दोन पक्षांमधून विस्तवही आडवा जात नसल्याची चर्चा आहे. परिणामी वणीत ‘युती’त फूट पडल्याचे दिसत आहे.अशीच गत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची आहे. राज्यात सतत १५ वर्षे सत्तेत असलेले आघाडीचे कार्यकर्ते आता परस्परविरोधी भूमिका घेत निवडणूक लढवीत आहे. वणी विधानसभेत काही ठिकाणी या दोन पक्षांनी कधी एकत्र, तर कधी विरोधात निवडणूक लढविली. बाजार समितीच्या निवडणुकीतही आघाडीतील हे दोन पक्ष परस्परांच्या विरोधात लढत आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता गमावल्याने आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिळेल त्या निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील झाले आहे. त्यामुळेच येथील बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळीच नवीनच राजकीय समीकरणे उदयास आली आहे. बाजार समितीत आत्तापर्यंत काँग्रेसच्या अ‍ॅड.विनायक एकरे यांच्या गटाला सहकार्य करणारी शिवसेना यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या काँग्रेससोबत आहे. त्याचप्रमाणे आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या मदतीला धावून गेली असून ते अ‍ॅड.एकरे यांच्या सहकार्याने बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी लढणार आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार व माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणारी आहे.एकीकडे विद्यमान आमदार, तर विरोधात दोन माजी आमदारांमधील हा सामना चांगलाच रंगणार आहे. विद्यमान आमदारांच्या साथीला राष्ट्रवादीचे संजय देरकर आणि अ‍ॅड.विनायक एकरे आहे. दोन माजी आमदारांच्या मदतीलाही अ‍ॅड.देविदास काळे आहे. दोन्ही बाजूंनी दोन वकिलांनी या लढतीत चांगलीच चुरस निर्माण केली आहे. या वकिलांच्या नेतृत्वातच ही निवडणूक लढली जाणार असल्याचे संकेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)