शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

११ कोटींच्या भूखंड घोटाळ्यात आरोपींचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. परंतु ही संपत्ती बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन परस्पर विकली गेली.

ठळक मुद्देश्रोत्री हॉस्पिटल चौकातील प्रॉपर्टी, पोलीस तपासावर न्यायालयाचे ताशेरे, भूमाफियांना रेकॉर्डवर आणण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक श्रोत्री हॉस्पिटल चौकातील दिवंगत काजी यांची ११ कोटींची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे अवघ्या दीड कोटीत विकली गेली. या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना आधी सत्र न्यायालयाने अटकपूर्व आणि आता प्रथम श्रेणी न्यायालयाने नियमित जामीन नाकारला. शिवाय पोलिसांच्या तपासावर ताशेरेही ओढले.देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्षा किती तरी अधिक आहे. परंतु ही संपत्ती बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन परस्पर विकली गेली. काजी यांचे वारसदार मोईन काजी रा. आकारनगर काटोल रोड, नागपूर यांनी या संपत्तीचे मुखत्यार म्हणून सै.हबीबूल हसन काद्री यांना नियुक्त केले आहे.ही संपत्ती परस्पर विकली गेल्याचे कळताच हबीबूल हसन यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२० रोजी भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० (ब) व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी मनोज पांडुरंग पाटील रा. काठोडा ता. आर्णी, सखाराम जनार्दन देवघरे रा. शंकर टॉकीजसमोर दिग्रस, इफ्तेखार खान गुलाब खान रा. संभाजीनगर दिग्रस, आलमगीर जहागीर खान पठाण रा. संभाजीनगर दिग्रस, हिंमत नामदेवराव नागमोडे रा. सेलू ता. आर्णी यांना अटक करण्यात आली. या आरोपींचा २७ ऑगस्टला जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. तर ९ सप्टेंबर रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस.एच. अटकरे यांनी जामीन नाकारला.११ कोटींच्या या भूखंड खरेदी प्रकरणात स्थानिक भूमाफिया यात सहभागी आहेत, त्यांना राजकीय अभय असल्याने त्यांना रेकॉर्डवर घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांचे हात या माफियांपर्यंत पोहोचतात का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.न्यायाधीश म्हणाले, प्रकरण गंभीर, जन्मठेप होऊ शकतेपाचही आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकील म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे. यातील कलम ४६७ नुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तपास यंत्रणेला आणखी बऱ्याच गोष्टी उघड करायच्या आहेत.आरोपींच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी करताना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एच. अटकरे म्हणाले, आरोपींनी बनावट मृत्यूपत्र तयार करून या आधारे भूमिअभिलेख कार्यालयात भूखंडासंदर्भात खोटी आखीव पत्रिका तयार केल्याची तक्रार आहे. त्यात संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तपास अधिकाºयांची भूमिका संशयास्पद आहे. प्रकरण गंभीर असून यात बनावट आखीव पत्रिका तयार करण्यात आणखी कोण कोण समाविष्ट आहे, याचा शोध घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :mafiaमाफिया