शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

तिहेरी हत्याकांडातील आरोपीला आर्णीत अटक

By admin | Updated: October 31, 2015 00:27 IST

येथील मच्छीपूल परिसरातील तिहेरी हत्याकांडातील एका आरोपीला शहर ठाण्याच्या शोध पथकाने आर्णीतून अटक केली.

इतरांचा शोध सुरू : अटक संख्या झाली पाचयवतमाळ : येथील मच्छीपूल परिसरातील तिहेरी हत्याकांडातील एका आरोपीला शहर ठाण्याच्या शोध पथकाने आर्णीतून अटक केली. आपसी वैमनस्यातून शनिवारी झालेल्या या हत्याकांडात तब्बल २२ आरोपी असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.जावेद अली उर्फ कबुत्तर (२५) रा. कुरेशीपुरा यवतमाळ असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. जावेद हा इकबालचा हस्तक म्हणून काम करीत होता. गुुरुवारी रात्री जावेद आर्णी येथे दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी शिताफीने त्याला अटक केली. त्याने पोलिसांकडे घटनेची कबुली दिली असून शस्त्रे जप्ती आणि इतरही आरोपींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. परस्पर विरोधी गटातील पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडले असले तरी यातील आरोपींची संख्या बरीच मोठी आहे. त्या तुलनेत केवळ पाच आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांची वेगवेगळी दोन पथके घेत आहे. एका पथकाने अटक केलेल्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)