शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: November 2, 2014 22:39 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला.

यवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला. दिग्रस येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, निंभा येथील अरुण किसन लोखंडे (४०) हे गजानन गणथडे यांच्या शेतात थ्रेशरने सोयाबीन काढत होते. या मशीनमध्ये अडकलेले गवत काढताना अडकून अरुण लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी थ्रेशर मशीन खोलून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अरुण लोखंडे याच्या मागे पत्नी, सहा मुली, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. पंचनामा आणि पुढील कारवाई दिग्रस पोलीस ठाण्याचे श्याम लांडगे, संजय नेटके, किसन राठोड यांनी पार पाडली. उत्तरीय तपासणी घटनास्थळीच डॉ. प्रशांत रोकडे यांनी केली. यावेळी पोलीस कर्मचारी कुमरे, मुनेश्वर आदी उपस्थित होते.फुलसावंगी येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शेतातील कापूस विक्रीसाठी आणताना वाहन उलटून झालेल्या अपघातात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिरपुल्ली ते फुलसावंगी दरम्यान घडली. परसराम भिक्कू राठोड (४५) रा. इवळेश्वर ता. माहूर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. परसराम हे एम.एच.२६-एच-४८९२ या अ‍ॅपेने आपल्या शेतातील कापूस विक्रीसाठी फुलसावंगी येथे आणत होते. दरम्यान खराब रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अ‍ॅपे उलटला. यात शेतकरी परसराम राठोड हे ठार झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. घटनेची तक्रार दत्ता भिक्कू राठोड (रा. घमापूर) यांनी दराटी पोलिसात दिली. ठाणेदार सागर इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पंधरे, पोलीस शिपाई गेडाम, विजय चव्हाण, संभाजी मारकवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथे रवाना केला. शिरपुल्ली ते फुलसावंगी हा मराठवाडा ते विदर्भाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशाच प्रकारातून घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचा नाहक बळी गेला.