शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

मंगळवार अपघात वार

By admin | Updated: February 3, 2016 02:33 IST

जिल्ह्यात विविध चार ठिकाणी ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात तीन जण ठार झाले. तर १४ जण गंभीर जखमी झाले.

चार घटना : तिघांचा मृत्यू, महिलांसह १४ प्रवासी गंभीर जखमी यवतमाळ : जिल्ह्यात विविध चार ठिकाणी ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातात तीन जण ठार झाले. तर १४ जण गंभीर जखमी झाले. उमरखेड तालुक्यात चिल्ली येथे दोन जण ठार, पांढरकवडा तालुक्यातील सुन्नी येथे एक जण ठार तर बाभूळगाव तालुक्यातील थाळेगाव फाट्याजवळ अपघातात नऊ महिला तर आर्णी तालुक्यातील दाभडी येथे दोन तरुण गंभीर जखमी झाले. जिल्ह्यासाठी मंगळवार हा जणू अपघातवारच ठरला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिल्ली गावाजवळ सोमवारी रात्री ९.३० वाजता दुचाकीला भरधाव बोलेरो जीपने धडक दिली. या अपघातात अशोक बाबूराव खराटे (२०), ज्ञानेश्वर बालाजी खराटे (२२) दोघे रा. जनुना ता. उमरखेड हे ठार झाले तर मोतीराम सीताराम कांबळे गंभीर जखमी झाला. हे तिघेही सोमवारी रात्री दुचाकीने जात असताना बोलेरो जीपने दुचाकीला धडक दिली. तिघेही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. याची माहिती उमरखेड पोलिसांना होताच घटनास्थळ गाठले. अशोक खराटे हा जागीच ठार झाला होता. तर गंभीर जखमी ज्ञानेश्वरचा मृत्यू उपचारासाठी नेत असताना झाला. तिसरा जखमी मोतीराम कांबळे याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बोलेरो चालक विजय चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पांढरकवडा तालुक्यातील सुन्ना गावाजवळ मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शेख गफ्फूर शेख इमाम (५५) रा. लिंगटी ता. झरी हे ठार झाले. तर बाबाराव तानबा उईके (४०) व नामदेव छत्रपती राऊत (५५) गंभीर जखमी झाले. ते तिघे जण न्यायालयात तारखेसाठी जात होते. त्यावेळी सुन्ना गावाजवळ ट्रक क्र. ए.के.२५-बी-७८०० ने जबर धडक दिली. तिसरा अपघात आर्णी तालुक्यातील दाभडी गावाजवळ घडला. परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांवर आदळल्याने गजानन शंकर राठोड (३५) रा. पांगरी आणि मिलिंद दत्ता वानखडे (३०) रा. दाभडी गंभीर जखमी झाले. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (लोकमत चमू)महिलांना घेऊन जाणाऱ्या मिनीडोअरला धडक भरधाव ट्रकने मिनीडोअरला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी दुपारी बाभूळगाव तालुक्यातील थाळेगाव (मिटनापूर) फाट्याजवळ घडली. चौघींची प्रकृती गंभीर असून त्यांना यवतमाळला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.बाभूळगाववरून रेती भरुन अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रक एम.एच.२७-एक्स-२३३६ ने मिनीडोअर एम.एच.२९-एम-६८२८ ला जबर धडक दिली. यात बेबीबाई अशोक भेंडारकर (४२), शोभाताई सुधाकर विरखेडे (४०), माया दीपक ठाकरे (४५), रेणुका अरविंद नेहारे (३५) सर्व रा. बारड ता. बाभूळगाव असे गंभीर जखमीचे नावे आहेत. त्यांच्यावर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर शेवंताबाई नेहारे (६२), प्रभाताई महल्ले (६५), अनुसया येटरे (६०), शोभाताई भेंडारकर (५०), शोभाबाई ठाकरे (५५) सर्व रा. बारड जखमी झाले असून त्यांच्यावर बाभूळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी सर्व जखमींना मिनीडोअर बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात हलविले. या प्रकरणी ट्रक चालक मंगेश गुलाबराव सोनोने (२८) रा. वडाळी अमरावती याला अटक करून गुन्हा नोंदविला.