शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:15 IST

‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे.

ठळक मुद्देकर्तव्य बजावताना गमावला जीव

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुटुुंबाच्या बँक खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोकवाहिनी लोकांच्या सेवत होती. ही सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या कर्मचाºयांना विम्याचे कवच पुरविण्यात आले. मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. महामंडळातील १४४६ अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. यातील ८९० जण बरे झाले आहे. मात्र उपचार घेत असताना ४४ जणांचा जीव गेला. सद्यस्थितीत ५९२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार केले जात आहे.

दिवंगत कर्मचाºयांना विम्याचे कवच असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ठरल्यानुसार ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी लागणाºया रकमेची तरतुदही महामंडळाला करावी लागली. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटावर अपघात सहायता निधी कपात केला जातो. या निधीचा उपयोग बस अपघातात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी केला जातो. चार वर्षांपासून हा निधी गोळा केला जातो. यातूनच काही रक्कम खर्च झाली आहे. या निधीचे काही महिन्यापर्यंत २०० कोटी महामंडळाकडे जमा होते.

या जमा रकमेतून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे. ५० लाखांची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाकडून विभागाच्या मागणीनुसार वर्ग करण्याचे अधिकारी अपघात सहायता निधी सदस्य तथा मुख्या लेखा अधिकारी यांना देण्यात आले आहे.वादविवाद टाळण्यासाठी दक्षताभविष्यात उद्भवणारे संभाव्य वादविवाद टाळण्याची दक्षताही महामंडळाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रात वारस नमूद नसल्यास अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. एकापेक्षा अधिक वारस असल्यासह आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस