शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

रेती माफियांना महसूलचे ‘अभय’

By admin | Updated: December 6, 2014 22:57 IST

झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कमळवेल्ली घाटावर गत एक महिन्यापासून पैनगंगेच्या पात्रात रेतीचा वारेमाप उपसा सूरू आहे. गेल्या वर्षभरात रेतीचा जितका उपसा झाला नाही,

पाटणबोरी : झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कमळवेल्ली घाटावर गत एक महिन्यापासून पैनगंगेच्या पात्रात रेतीचा वारेमाप उपसा सूरू आहे. गेल्या वर्षभरात रेतीचा जितका उपसा झाला नाही, तितका गेल्या महिनाभरात झाला आहे़पैनगंगेला वर्षभर पाणी असते़ पावसाळ्यात तर ही नदी दुथडी भरूनच वाहते. या नदीत रेतीचा भरपूर साठा असतो. तथापि यावर्षी रेती घाटांचे लिलाव ३१ सप्टेंबरपर्यंतच असल्याने लिलावधारकाला पाहिजे त्या प्रमाणात रेतीचा उपसा करता आला नाही़ मात्र ३१ सप्टेंबरनंतर महसूल विभागाच्या मूक आशिर्वादाने रेती माफियाचे चांगलेच फावत आहे. महसूल विभागाचा एक अधिकारी व रेती माफियांचे ‘साटेलोटे‘ असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या आशिर्वादाने सध्या वारेमाप रेतीचा अवैध उपसा सुरू आहे.संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हे सर्व सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. प्रति ट्रॅक्टर ५०० रूपये संबंधित अधिकाऱ्याला द्या आणि पाहिजे तितक्या रेतीचा उपसा करा, असे एका ट्रॅक्टर चालकानेच बोलून दाखविले़ दरवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर दरम्यान रेती घाट खुले झाल्यानंतर सदर अधिकारी अशाच प्रकारे रेती माफियांना रान मोकळे करून देतात, असेही त्याने कबूल केले. यात शासनाला लाखोंचा चुना लागत असून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र लाखोंचा मलीदा मिळत आहे. हाच फंडा वापरून सदर महसूल अधिकाऱ्यांनी प्रचंड ‘माया‘ गोळा केल्याची चर्चा आहे. सदर अधिकारी कमळवेल्ली येथीलच मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. यापूर्वी तलाठी असतानासुध्दा त्यांचा या रेती घाटावर एकतर्फी कब्जा होता, असे सांगण्यात येते. ट्रॅक्टर चालक व मालकांना कायद्याची भीती दाखवून धाकदपट करून अवैधरीत्या पैसे उकळले जाते़ सध्या कमळवेल्ली घाटावर २० ते २५ ट्रॅक्टर तसेच काही ट्रकनेसुध्दा दिवसरात्र रेती उपसा सुरू आहे़ त्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)