शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथील अपहृत विद्यार्थिनींना अमरावतीतून घेतले ताब्यात

By admin | Updated: February 9, 2017 00:16 IST

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तीन अल्पवयीन मुलींसह पाच जणींना नेर पोलिसांनी बुधवारी अमरावती येथून ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुली : मुंबईची तयारी हुकली नेर : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील तीन अल्पवयीन मुलींसह पाच जणींना नेर पोलिसांनी बुधवारी अमरावती येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात या मुलींचा शोध घेतल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ठाणेदार संजय पुज्जलवार व पथकाचे कौतुक केले. आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तीन पालकांनी नेर पोलिसात केली. एकाचवेळी दाखल झालेल्या तक्रारीमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी कुठलाही विलंब न करता शोध सुरू केला. मुलींजवळ असलेल्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. त्यावेळी ते मुंबई येथे दाखविले जात होते. दरम्यानच मुलींनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क करून आपण मुंबईत असून घरी परत येणार नसल्याचे सांगितले जात होते. याप्रकरणात काहीतरी गोंधळ असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यांनी लोकेशन घेणे सुरूच ठेवले. अखेर अमरावतीच्या महाजनपुरा भागात त्यांचे लोकेशन दाखविले जात होते. यासाठी नेर पोलिसांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांची मदत घेतली. एका रूममधून नेरच्या तीन मुलींसह पाच जणींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या नेर येथील मुलींनी सांगितल्यानुसार अमरावती येथे एका कापड दुकानात काम करत असलेल्या मुलीची अमरावती येथे भेट झाली. आपल्याला काम हवे आहे, असे तिला सांगितले. ती आम्हा तिघींनाही स्वत:च्या किरायाने राहात असलेल्या रूमवर घेवून गेली. पालकांकडून अभ्यासासाठी तगादा लावला जात असल्याने घर सोडले. स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. त्यामुळे घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला, असे या मुलींनी सांगितले. ज्या मुलीच्या आश्रयाला त्या गेल्या होत्या, त्या मुलीसह भातकुली येथील एका मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलींकडून कुटुंबाला वेळोवेळी दिली जाणारी चुकीची माहिती, कापड दुकानात काम करणाऱ्या मुलीची झालेली भेट आणि तिने दिलेला आश्रय, सर्व मुली अल्पवयीन, या सर्व प्रकाराने विविध शंकांना जन्म दिला आहे. याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या मुलींना ताब्यात घेण्याची कारवाई ठाणेदार संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक माया वैश्य, अजय भुसारी, गुणवंत पाटील यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)