शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार?

By अविनाश साबापुरे | Updated: March 31, 2024 18:09 IST

पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारच नाही.

यवतमाळ : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले आहे. तर १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, पाच लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागण्याची भीती आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राची किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची वैधता ३० मार्चपर्यंत यूडायसवर पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यात यवतमाळसह केवळ १२ जिल्ह्यांनी बाजी मारली. तर उर्वरित जिल्ह्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पुरविल्यानंतर ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्याही ३२ हजार ९५ इतकी प्रचंड आहे. त्यामुळे लवकरच जे जिल्हे ९५ टक्के कामगिरीच्या आसपास पोहोचले आहेत, ते हा टप्पा ओलांडणार आहेत. परंतु, त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळते की नाही, हा प्रश्न अधांतरी आहे. आधार इनव्हॅलिड ठरलेले विद्यार्थीजिल्हा : आधार फेलसिंधुदुर्ग : ६२२कोल्हापूर : ७९५९गडचिरोली : ३१४९सांगली : ६९५१भंडारा : ६७५८गोंदिया : ६९७०रत्नागिरी : ७४५७अहमदनगर : २५०६३चंद्रपूर : १२०९२बुलडाणा : १६४९३यवतमाळ : १३५४०सातारा : १६४९९परभणी : ११३९७हिंगोली : ७०६०अमरावती : १५०४७वर्धा : १०४८३लातूर : १७७९५पुणे : ६५९९५वाशिम : ९४६५नाशिक : ५५०१७जळगाव : ३९५८६अकोला : १५३३३नागपूर : ४७४९३धाराशिव : १८०६१धुळे : २८१२९सोलापूर : ५८८०३नंदूरबार : २१७७४बीड : ३९९८५जालना : ३०८४८नांदेड : ५३७५३रायगड : ४०९७१मुंबई : १०३७५४मुंबई उपनगर : ३८०९१छत्रपती संभाजीनगर : ९५५३२ठाणे : १८५२४०पालघर : १०३३१९एकूण : १२,३६,४८४ बारा जिल्ह्यांना आले अभिनंदनाचे पत्रविद्यार्थी आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठविले आहे. यवतमाळ (९५.२५), सिंधुदुर्ग (९९.२४), कोल्हापूर (९७.८९), गडचिरोली (९७.४०), सांगली (९७.२९), भंडारा (९६.४७), गोंदिया (९६.३५), रत्नागिरी (९६.३१), अहमदनगर (९६.२५), चंद्रपूर (९५.६६), बुलडाणा (९५.२७) आणि सातारा (९५.२३) या १२ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह, शिक्षणाधिकारी, संगणक प्रोग्रामर, गटशिक्षणाधिकारी, एमआयएस काॅर्डिनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर व यूडायसचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यात राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ