शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध

By अविनाश साबापुरे | Updated: August 20, 2023 17:55 IST

मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.

यवतमाळ : वातावरणात प्रदूषण वाढविणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा, तो सोन्याच्या अतिसूक्ष्म कणात साठवायचा, त्यातून ‘काळे सोने’ मिळवायचे आणि त्यातून हरित इंधन तयार करायचे... असे लोकोपयोगी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा जगातील टाॅप टेन शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाला आहे. कोण आहेत हे शास्त्रज्ञ? त्यांचे नाव आहे डाॅ. विवेक पोलशेट्टीवार आणि ते आलेत झरी तालुक्यातील मांगली नावाच्या छोट्याशा खेड्यातून..! 

मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे. जर्मनीतील ‘फॉलिंग वॉल्स’ या अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या सोसायटीतर्फे दरवर्षी जगभरातील तरुण संशोधकांतून उत्कृष्ट शास्त्रज्ञांची निवड केली जाते. त्यात यंदा हजार शास्त्रज्ञांमधून डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांच्यासह अन्य नऊ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली. त्यांना नोव्हेंबरमध्ये बर्लीन येथे ‘फॉलिंग वॉल्स’ पुरस्काराने त्यांना हार्वर्ड, येल, आयबीएम, ईटीएच, एमआयटी आणि मॅक्स प्लँक येथील नामांकित शास्त्रज्ञांसह सन्मानित केले जाणार आहे. 

विवेक पोलशेट्टीवार हे झरी तालुक्यातील मांगली या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर वणीत बीएसस्सी आणि अमरावतीमध्ये एमएसस्सी केले. ग्वाल्हेरमध्ये पीएचडी केली. त्यानंतर फ्रान्स, अमेरिकेत सखोल संशोधनाचे काम केल्यावर परदेशी नोकरीच्या अनेक संधी खुणावत असताना त्यांनी देशातच सेवा देण्याचा निश्चय केला आणि मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये ग्रीन केमेस्ट्री या क्षेत्रात मुलभूत संशोधनावर काम करीत आहेत. 

असे आहे संशोधन नॅनो टेक्नॉलॉजी वापरून विवेक पोलशेट्टीवार यांनी सोन्याच्या नॅनो कणांमधील आकार आणि अंतर बदलून पिवळ्या सोन्याचे काळ्या सोन्यात रूपांतर केले. एखादे झाड ज्याप्रमाणे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, त्याच प्रमाणे हे काळे सोनेही कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. या काळ्या सोन्याच्या आधारे कार्बनडाय डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाण्यातील हायड्रोजन एकत्र साठवून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यातून मिथेनसारखे इंधन तयार केले जात आहे. प्रदूषण टाळणारे इंधन उत्पादित करणारे कृत्रिम झाड म्हणून या ब्लॅक गोल्डचा पुढील काळात वापर होणार आहे. पोलशेट्टीवार आता या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कार्बन डायऑक्साइडचे संग्रहण आणि पाण्यातील ऑक्सीजनपासून हायड्रोजन वेगळा करणे कठीण काम होते. तर सौरउर्जा साठविणे महाकठीण काम होते. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे कृत्रिम प्रकाश संश्लेषणच. पण आम्ही तयार केलेल्या ब्लॅक गोल्डमुळे ही प्रक्रिया शक्य झाली. आता त्यातून हरित इंधन तयार होणे शक्य आहे. लॅबमध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय. आता त्याचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- डॉ. विवेक पोलशेट्टीवार, संशोधक 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ