शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मातेने औषधातून चिमुकलीवर केला विषप्रयोग; 'या' कारणातून महिलेचे टोकाचे पाऊल

By सुरेंद्र राऊत | Updated: December 19, 2022 17:44 IST

वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल

यवतमाळ : तीन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले. त्यानंतर पाच वर्षाच्या चिमुकलीसह सासरी राहणाऱ्या महिलेने अचानक टोकाचा निर्णय घेतला. तिने स्वत:च्या मुलीला खोकल्याच्या औषधात विष दिले. नंतर स्वत:ही विषाचा घोट घेतला. यात चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ती महिला उपचारातून पूर्णत: बरी झाली. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ मध्ये आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे घडला. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला. मात्र फॉरेन्सीक अहवाल येताच महिलेवर मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐश्वर्या संतोष जाधव (५) रा. खंडाळा असे मृत मुलीचे नाव आहे. तिची आई पूजा संतोष जाधव (२८) रा. खंडाळा ता. आर्णी हिने मुलीवर विष प्रयोग करून हत्या केल्याचा आरोप आहे. पूजा जाधव यांचा पती संतोष जाधव याने २०१८ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. उमरखेड तालुक्यातील माहेर असलेली पूजा पतीच्या निधनानंतरही सासरी राहत होती. तिला दीर, सासू-सासरे असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर पूजा पाच वर्षाच्या ऐश्वर्याला घेवून कुटुंबासोबत रमली होती. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये पूजाने स्वत:च्या खोलीत कोंडून घेत मुलीला खोकल्याच्या औषधातून विष दिले व स्वत:ही विष प्राशन केले. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी दोघींना यवतमाळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ऐश्वर्याचा मृत्यू झाला. तर दीर्घ उपचारानंतर पूजा यातून बचावली.

या प्रकरणी आर्णी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्यावेळी पोलिसांना व्हिसेरा तपासणी अहवाल आणि मृत्यूचे कारण कळू शकले नाही. यामुळे हा गुन्हा तपासात होता. अखेर ७ नोव्हेंबर २०२२ ला फॉरेन्सीक अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये विषप्रयोगाने ऐश्वर्याचा मृत्यू झाला, हे पुढे आले. यावरून पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या तक्रारीवरून पूजा संतोष जाधव यांच्याविरोधात कलम ३०२ व ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्याचा आता तपास करीत आहे.

पूजाने आत्महत्येचा प्रयत्न का केला ? 

पतीच्या निधनानंतर तीन वर्ष सर्व सुरळीत असताना पूजाने स्वत:सह मुलीला संपविण्याचा प्रयत्न का केला, याचा शोध पोलीस घेत आहे. हा निर्णय घेण्यामागे कुठले कारण आहे, याला कोण जबाबदार, इतर कुणाचा या घटनाक्रमात समावेश आहे का, याचाही शोध आर्णी पोलिसांकडून घेतला जाणार आहे, असे तपास अधिकारी आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ