शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत  

By विशाल सोनटक्के | Updated: April 17, 2024 05:35 IST

१९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला. 

विशाल सोनटक्के, लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २५ वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड अशी ओळख असलेल्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात यंदा उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने ठाकले आहेत. या चुरशीच्या लढाईत उद्धवसेना जिंकणार की शिंदेसेना बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात यवतमाळसह राळेगाव, दिग्रस आणि पुसद हे चार तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. १९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला. 

मध्यंतरी सेनेतील बंडाळीवेळी त्यांनी उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला.  मात्र, ॲन्टीइनकम्बन्सीच्या भीतीने शिंदेसेनेने गवळी यांच्याऐवजी यावेळी राजश्री पाटील यांना महायुतीकडून रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे नेहमीप्रमाणे काँग्रेस उमेदवाराऐवजी महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संजय देशमुख  मैदानात उतरले आहेत. देशमुख यांचा पारंपरिक पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यांना काँग्रेसची साथ मिळत आहे. तर ऐनवेळी मैदानात उतरलेल्या राजश्री पाटील यांच्या पाठीशी आमदारांचे पाठबळ आहे. अत्यंत कमी काळात त्यांनी मतदारसंघात हायटेक प्रचारयंत्रणा उभारत तोडीसतोड प्रचार सुरू केल्याने चुरस वाढली आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा दोन्ही उमेदवारांचा प्रयत्न आहे. 

महायुतीला मिळणार का आमदारांचे बळ? मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील यवतमाळ, राळेगाव, वाशिम आणि कारंजा हे चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दिग्रस विधानसभेत सध्या शिंदेसेनेचे संजय राठोड तर पुसद मतदारसंघ इंद्रनील नाईक यांच्या रूपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. मतदारसंघातील सर्व सहाही आमदार महायुतीचे असल्याने याचा फायदा महायुतीच्या राजश्री पाटील यांना होऊ शकतो. 

एकूण मतदार    २१,६१,१६८पुरुष ११,१५,०९३महिला १०,४६,०२३

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.  मागील लोकसभा निवडणुकीत ९४ हजारांवर मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने खेचली होती. यंदा लोकसभेच्या मैदानात वंचितचा उमेदवार नसल्याने ही मते महाविकास विकास आघाडीकडे वळल्यास संजय देशमुख यांचे बळ वाढू शकते. 

निवडणुकील कळीचे मुद्देसर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मतदारसंघात होतात. कापूस, सोयाबीन पिकांच्या भावासह शेतकऱ्यांचे प्रश्न याही निवडणुकीत ऐरणीवर आहेत. मागील २० वर्षांत एकही मोठा उद्योग आलेला नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्नमोठा आहे. दोन्ही पक्षांकडून याहीवेळी आश्वासने दिली जात आहेत. यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत हात हे चिन्ह नाही. दोन्ही शिवसेनेचेही चिन्ह बदलले आहे. हे चिन्ह पोहोचविण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. 

२०१९ मध्ये काय घडले?भावना गवळी    शिवसेना (विजयी)     ५,४२,०९८माणिकराव ठाकरे    काँग्रेस     ४,२४,१५९प्रवीण पवार,     वंचित बहुजन आघाडी     ९४,२२८नोटा        ३,९६६

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार     पक्ष    मते         टक्के१९९८     उत्तमराव पाटील काँग्रेस     २,९१,४१५ ४७.७० १९९९     उत्तमराव पाटील काँग्रेस    २,५८,५३५  ४२.०० २००४     हरिभाऊ राठोड     भाजप     २,९८,५१३   ४४.९४ २००९     भावना गवळी     शिवसेना     ३,८४,४४३  ४५.७६ २०१४     भावना गवळी     शिवसेना     ४,७७,९०५ ४६.२४ 

दुखावल्या गेलेल्या गवळी यांची भूमिका राहणार महत्त्वाचीया मतदारसंघावर बंजारा, कुणबी, आदिवासी, दलित आणि मुस्लीम या घटकांचे प्राबल्य आहे. त्यातही बंजारा आणि कुणबी मतदार बहुसंख्य आहेत. कुणबी मते वळविण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. भावना गवळी यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. भाकरी फिरविण्याच्या निर्णयामुळे दुखावलेल्या गवळी या शेवटच्या क्षणी काय भूमिका घेतात, यावरही निवडणूक निकालाचे गणित अवलंबून राहील. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४