शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अडानच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरुप काढले बाहेर; पाच तास चालली बचाव मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 14:30 IST

सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे.

यवतमाळ : अडान नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी तालुक्यातील कोपरीजवळ एक व्यक्ती अडकून पडली होता. प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून सदर व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहत आहे. कोपरी येथील भाऊराव सातघरे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी कोपरीजवळ अडान नदीपात्रात गेले होते. अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे ते तेथे अडकून पडले. दरम्यान ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. याची माहिती पोलिस पाटील  निलावर यांनी रात्री १२ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली. या प्रकरणाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती घेवून आपत्ती व्यवस्थापन विभागास सर्व सहित्यानिशी पथक रात्रीच रवाना करण्याचे निर्देश दिले व अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याची सूचना केली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथकाने घटनास्थळ गाठून मोहीम सुरू केली. नदीची वाढणारी पाणी पातळी आणि त्यात रात्रीची वेळ यामुळे प्रारंभी अडथळे आले परंतू शेवटी पथकास यश आले. तब्बल पाच तास अस्का लाईटच्या मदतीने शोध मोहिम राबवून सदर व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ही मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मोहिम घाटंजीचे तहसिलदार विजय साळवे, अतिरिक्त तहसीलदार मोहनिस शेलवटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्या उपस्थितीत शोध व बचाव पथक प्रमुख किशोर भगत यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत मंडळ अधिकारी चावरे, पोलिस पाटील श्रीमती निलावर, पोलिस कर्मचारी सुमित सोनवणे, निरज पातुरकर, धीरज गावंडे , यशवंत गिरी, लखन कैथवास, पुकार वाकोडे, कमलेश काकडे, शेख मुनीर, विवेकानंद आमुखे, स्वप्नील सबाल, राम मस्के, अमोल ढोके आदींचा सहभाग होता.

नागरिकांनी सतर्क रहावे - अमोल येडगेसततच्या पावसामुळे नाले, ओढे पूर्ण क्षमतेने वाहत आहे. तसेच काही प्रकल्पातून पाणी सोडले जात असल्यामुळे ग्रामस्तरीय समित्या व नागरिकांनी सतर्क रहावे. कार्यकारी अभियंत्यांना धरणातून पाणी सोडावयाचे असल्यास तहसिलदारांशी समन्वय साधावे. नदी, नाले, ओढे, पुल यावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी त्यातून जाण्याचे टाळावे, मासेमारी, पुलावरुन पाणी वाहत असताना दुचाकी टाकने इत्यादी प्रकार टाळावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूरYavatmalयवतमाळ