शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांविरोधात खटला भोवला; याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 22:33 IST

पोलीस कारवाईविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका दाखल केली. नंतर याच प्रकरणात रिट पिटीशन करून कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा दावा आरोपीने केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा दावा व याचिका फेटाळून लावत आरोपी पोलिसांवर दबाव आणत असल्याचे निष्कर्ष नोंदविले. न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात एक लाखाचा दंड ठोठावला. 

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दगडी कोळसा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी भादंवितील कलम ३७९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. या पोलीस कारवाईविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका दाखल केली. नंतर याच प्रकरणात रिट पिटीशन करून कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा दावा आरोपीने केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा दावा व याचिका फेटाळून लावत आरोपी पोलिसांवर दबाव आणत असल्याचे निष्कर्ष नोंदविले. न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात एक लाखाचा दंड ठोठावला. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत २०२१ मध्ये कोळसा चोरीचा गुन्हा दाखल झाला. यात फिर्यादी जमादार हरिभाऊ सुरपाम हे होते. त्यावरून इर्शाद खान इकबाल खान (रा. साईनगर, वणी) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात आरोपी इर्शाद खानने वणी न्यायालयात एफआयआर रद्दसाठी याचिका दाखल केली. हे प्रकरण सुरू असतानाच आरोपीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे धाव घेतली. त्याने न्यायालयापुढे याचिका सादर करताना पोलिसांची कारवाई आकसपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच तपास अधिकारी व तक्रारदार पोलीस यांच्याकडून प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा दावा केला. या संदर्भात न्या. रोहित देव आणि अनिल पानसरे यांच्या बेंचपुढे सुनावणी झाली. आरोपीची फौजदारी रिट पिटीशन फेटाळून लावत आरोपीकडून लोकसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असे मत न्यायालयाने नोंदविले. आदेश होताच १५ दिवसांच्या आत याचिकाकर्ता आरोपी इर्शाद इकबाल खान याने एक लाख रुपये रक्कम रजिस्ट्रीद्वारे पोलीस कल्याण निधीत हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.  न्यायालयाच्या या आदेशामुळे याचिकेच्या माध्यमातून तपास यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांना चपराक बसली आहे. अन्यायपूर्ण कारवाई असल्यास न्यायालयाकडून दिलासा दिला जातो. मात्र या प्रक्रियेचा आधार घेऊन स्वत:च्या सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिक्षासुद्धा होते या निकालातून पुढे आले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस