शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानधन योजनेसाठी राज्यातील ९४ लाख शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:33 IST

सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराज्याला ५६४० कोटींचा वाटा औरंगाबाद विभागात मिळणार सर्वाधिक लाभ

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. केंद्र शासनाला दरवर्षी राज्याकडे पाच हजार ६४० कोटी रूपये वळते करावे लागणार आहे. याचा सर्वाधिक लाभ औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांना होणार आहे.या योजनेत प्रारंभी छोटेच शेतकरी होते. आता मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला. या निकषा नुसार शेतकऱ्यांची निवड करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात एक कोटी ७९ लाख शेतकरी खातेधारक आहेत. त्यांच्याकडे एक कोटी ४७ लाख हेक्टर शेतजमीन आहे. यातील ८५ लाख शेतकरी अपात्र ठरले. ९४ लाख ५४ हजार २६४ शेतकऱ्यांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम जिल्हास्तरावर केले जात आहे. ९१ टक्के शेतकऱ्यांची नावे आॅनलाईन करण्यात आली आहे. दोन हजार रूपये मदतीचा पहिला टप्पा राज्याकडे वळता झाला आहे. दुसरा टप्पा वळता व्हायचा आहे.औरंगाबाद विभागात ४७ लाख ५३ हजार ८२० शेतकरी खातेधारक आहेत. यातील २४ लाख ५२ हजार ३३६ शेतकरी योजनेत पात्र ठरले आहे. इतर विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. तर सर्वात कमी लाभार्थी कोकण विभागातील आहे. या विभागात २१ लाख २५ हजार ९३३खातेधारक आहेत. यातील सहा लाख ४० हजार ९४६ शेतकरी खातेधारक पात्र ठरले आहेत.असे आहेत जिल्हानिहाय पात्र शेतकरीपालघर एक लाख ७ हजार, रत्नागिरी दोन लाख दोन हजार, रायगड एक लाख २१ हजार, सिंधुदुर्ग एक लाख २७ हजार, ठाणे ८३ हजार ४३३, सातारा चार लाख ५८ हजार, पुणे चार लाख एक हजार, सोलापूर पाच लाख ७४ हजार, कोल्हापूर ४ लाख ३० हजार, सांगली तीन लाख ९५ हजार, अहमदनगर सहा लाख ५८ हजार, जळगाव चार लाख ५१ हजार, नाशिक चार लाख ५४ हजार, धुळे दोन लाख ३६ हजार, नंदुरबार एक लाख २९ हजार, औरंगाबाद तीन लाख सात हजार, नांदेड तीन लाख ९१ हजार, जालना दोन लाख ९० हजार, परभणी दोन लाख ६८ हजार, बिड चार लाख एक हजार, उसमानाबाद दोन लाख ४८ हजार, हिंगोली दोन लाख नऊ हजार, लातूर तीन लाख ३३ हजार, बुलडाणा तीन लाख ३५ हजार, वाशिम एक लाख ५६ हजार, यवतमाळ दोन लाख ७५ हजार, अमरावती दोन लाख ८४ हजार, अकोला एक लाख ७५ हजार, नागपूर एक लाख ७३ हजार, वर्धा एक लाख ३६ हजार, भंडारा एक लाख ५४ हजार, गांदिया एक लाख ७४ हजार, चंद्रपूर दोन लाख नऊ हजार, गडचिरोली एक लाख २३ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.८५ लाख शेतकरी अपात्रशासकीय नोकरी आणि राजकीय पदावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी न करण्याच्या सूचना आहेत. यानुसार राज्यातील ८५ लाख दोन हजार ८०९ शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी