शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

9 जणांचा मृत्यू; 197 नव्याने पॉझेटिव्ह, बरे झालेल्या 150 जणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 20:37 IST

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे.

यवतमाळ : आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 150 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात तब्बल नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 197 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 197 जणांमध्ये 124 पुरुष व 73 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील 10 पुरुष व 12 महिला, पांढरकवडा शहरातील सात पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरुष व एक महिला, महागाव शहरातील 11 पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील 10 पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील 21 पुरुष व 10 महिला, वणी शहरातील चार पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील पाच पुरुष व नऊ महिला, आर्णि शहरातील पाच पुरुष व सहा महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, यवतमाळ शहरातील 26 पुरुष व 18 महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, अकोला शहरातील एक महिला, अमरावती तालुक्यातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात 725 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 251 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3924 झाली आहे. यापैकी 2839 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 108 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 207 जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज (दि.4) 149 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 53209 नमुने पाठविले असून यापैकी 49905 प्राप्त तर 3304 अप्राप्त आहेत. तसेच 45981 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस