शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: December 19, 2015 02:34 IST

तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत असून गतवर्षी पाणी टंचाई विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव मंजुरीकरिता धूळ खात पडून आहे.

पाणीटंचाई : महागाव येथे कृती आराखड्याची खानापूर्ती महागाव : तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत असून गतवर्षी पाणी टंचाई विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव मंजुरीकरिता धूळ खात पडून आहे. त्यामुळे नवीन विहीर अधिग्रहण होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी महागाव तालुक्याला यंदा पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहे.महागाव पंचायत समितीत पाणीटंचाई आढावा बैठक ५ डिसेंबर रोजी घेण्यात आली. आमदार या बैठकीला उशिरा आल्याने बैठकीत पाणीटंचाईच्या विषयावर दीर्घ चर्चा झाली नाही. पाणीटंचाईच्या बैठकीत इतर विषयच जास्त हाताळण्यात आले. शिक्षण विभागाचा विषय सुरुवातीला घेण्यात आला. आरोग्य, बांधकाम, कृषी आणि बैठक संपताना पाणीटंचाईचा विषय घेण्यात आला. तोपर्यंत अनेक गावचे सरपंच बैठकीतून उठून गेले होते. त्यामुळे मुख्य विषय पाणीटंचाई कृती आराखड्याचा असतानाही त्यावर केवळ खानापूर्ती करण्यात आली. पाणीटंचाईच्या गावातील अनेक सरपंच पाणीटंचाईचा खास लेखाजोखा घेऊन आले होते. परंतु अनेक सरपंच उठून गेले. ११० गावांपैकी ३७ गावात पाणीटंचाईची झळ आतापासूनच जाणवत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका यावर्षी काळीदौला परिसरातील गावांना बसणार आहे. या भागातील किमान दहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गुंज, काळी जिल्हा परिषद सर्कलमधील गावे माळपठार आहे. अशा गावात पाणीटंचाई लवकर जाणवू लागते. या भागातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव सर्वाधिक आले आहे. अधिग्रहणात दर्शविलेली काही गावे आणि एकाच गावातून चार ते सहा प्रस्ताव संशयास्पद असल्याने उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला यांनी ते रोखून धरले आहे.यापूर्वी पंचायत समितीमधून अधिग्रहणाच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांनी घरच्या विंधन विहिरी अधिग्रहणात दाखवून लाखो रुपये उचल केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे सिंघला यांनी ४० लाख रुपये वितरित करण्यापूर्वी अधिग्रहणातील अनेक त्रुट्या काढल्या होत्या. तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाणी करून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना होत्या. पाणीटंचाईवर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीही गंभीर दिसत नाही. त्यामुळे अधिग्रहणातील कामांची पूर्तता अद्याप व्हायची आहे. गावागावात जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या सूचना आहे. त्याच प्रमाणे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी वस्तुस्थिती माहीत करून घेणे अपेक्षित आहे. गावागावातील सरपंच पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात गावाची नोंद करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात येत आहे. मात्र याची नोंद घेण्यास पंचायत समिती प्रशासन गंभीर दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)