शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोरोनाने ८५ तर इतर आजाराने ६५३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : मार्र्च ते आॅगस्टची स्थिती, कोरोनाचा मृत्यूदर कमीच, अवैध दारूचे सर्वाधिक रुग्ण

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातच नव्हे सर्वत्र कोरोना आजाराचा संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची चर्चा होत आहे. या स्थितीत इतर आजाराने, अपघात, विषबाधा, सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या तुलनेत याचे प्रमाण किती तरी पटीने अधिक आहे. मार्च महिन्यापासून २६ आॅगस्टपर्यंत इतर आजाराने ६५३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे. उपचारासाठी १८ हजार १९९ रूग्ण दाखल झाले. बाह्यरूग्ण तपासणी विभागातून एक लाख २७ हजार ४१३ रूग्णांनी तपासणी केली.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते. प्रत्यक्षात इतर आजार जिल्ह्यात धोकादायक ठरत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दूषित पाणी, दारूने दुर्धर आजार जडतात. याचा परिणाम किडणी, लिव्हर या अवयवांवर होतो. ग्रामीण भागात विषारी दारूचे सेवन केले जाते. हातभट्टीची ही दारू अतिशय घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक रुग्ण याचे उपचारासाठी येतात. अशा व्यसनी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर कोणती उपाययोजना नाही. सर्वत्र खुलेआम हातभट्टी व अवैध दारू विक्री सुरू आहे. अपघातात मरणाºयाचेही प्रमाण अधिक आहेत. आता फवारणीचा कालावधी असल्याने विषबाधा झालेले रुग्ण येत आहेत. शेतात काम करताना सर्पदंश झालेले रुग्ण येत आहे.या विविध कारणाने होणाºया मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणता येते. मात्र शासन दरबारी याचा स्वतंत्र विचार केला जात नाही. ही आकडेवारी वैद्यकीय रुग्णालयातून शासनाचे धोरण निश्चित करणाºया घटकापर्यंत पोहोचत नाही. फवारणी विषबाधेचा मुद्दा राजकीय वळणावर गेल्यावरच त्याची दखल घेतली जाते.प्रशासनस्तरावरून कोरोना संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची काटेकोर नोंद ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर संसर्गाचा फैलाव होऊन नये म्हणून कोरोना मृतावर नगरपरिषदेची चमू अंत्यसंस्कार करत आहे. यामुळे सर्वसमान्यांनी याची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तीन हजार २४९ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी २२१९ बरे झाले आहेत. तर ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरीही कोरोनामुळे होणाºया मृत्यूची सर्वात जास्त भीती बाळगली जात आहे. तुलनेने इतर अजारामुळे होणाºया मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना इतकीच खबरदारी इतर आजाराच्या मृत्यूबाबत घेतल्यास मृत्यूदर कमी करता येणार आहे.3,286जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरसह मेडिकलमध्ये केलेल्या एकूण तपासणीपैकी आतापर्यंत तीन हजार २८६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन हजार ४६२ (६८.२९%) रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले. तर आता कोरोना वार्डसह अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९७ (२३.९७%) इतकी आहे. तर यापैकी ८५ (२.६४%) पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही आकडेवारी ३० आॅगस्टपर्यंतची आहे.1,27,413मेडिकलच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात गेल्या सहा महिन्यात एक लाख २७ हजार ४१३ रुग्ण तपाणीसाठी आले. यापैकी एक लाख ९ हजार २१४ रुग्ण (८५.७१%) बाह्य विभागातच उपचार घेऊन घरी परत गेले. तर १८ हजार १९९ रुग्ण (१४.२८%) रुग्णालयातील विविध विभागात उपचारासाठी दाखल झाले. यापैकी ६५३ (३.५८%) रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला विविध कारणे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या