शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

पांढरकवडा उपविभागात ८२ टक्के पेरणी

By admin | Updated: June 29, 2017 00:19 IST

पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

दुबार पेरणीचे संकट : २५ टक्के बियाणे उगवलेच नाही, शेतकरी चिंतेत नरेश मानकर । लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यापैकी जवळपास २५ टक्के पेरणी उलटली असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी उपविभागातील चारही तालुक्यात दोन लाख ८६९ हेक्टर जमिन लागवडी योग्य आहे. यापैकी आत्तापर्यंत एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. पांढरकवडा उपविभागात दोन लाख ८६९ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी आटोपली आहे. यापैकी एक लाख १९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रात कपासी या नगदी पिकाची लागवड करण्यात आली. २४ हजार ७१० हेक्टरवर तूर, १९ हजार ४२० हेक्टरवर सोयाबीनची, तर ७४७ हेक्टर जमिनीवर ज्वारीची लागवड करण्यात आली. तालुक्यात आत्तापर्यंत ८३ टक्के पेरणी आटोपली आहे. ५३ हजार १४७ हेक्टर पैकी ४४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून सर्वाधिक ३१ हजार ४५० हेक्टर जमिनीवर कपासीची लागवड करण्यात आली आहे. चार हजार ६९० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून सात हजार ३४० हेक्टरवर तूरीची पेरणी करण्यात आली आहे. वणी तालुक्यातसुध्दा ८३ टक्के पेरणी आटोपली असून ६० हजार २९५ हेक्टरपैकी ५० हजार ११५ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. ४२ हजार ३२० हेक्टरवर कपासी, चार हजार ९०० हेक्टरवर तूर तर केवळ २५३० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मारेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७० टक्के पेरणी पुर्ण झाली असून ४५ हजार १८९ हेक्टरपैकी ३१ हजार ७९३ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये २२ हजार ५४० हेक्टरवर कपासी, चार हजार ८२० हेक्टरवर तूर, तर चार हजार २०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. झरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ९१ टके पेरणी आटोपली असून ४२ हजार २३८ हेक्टर पैकी ३८ हजार ५३६ हेक्टरवर ही पेरणी पुर्ण झाली आहे. २२ हजार ७६६ हेक्टरवर कपाशी,८ हजार हेक्टरवर सोयाबीन व ७ हजार ६५० हेक्टरवर तूरीची लागवड करण्यात आली. गेल्या तीन चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत असतांना यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे शेतकरी नव्या उमेदीने आपल्या शेतीच्या पेरणीसाठी कामाला लागला होता. मोठ्या आशेने कर्ज काढून, उधारवाडीने बी बीयाने खरेदी केले. परंतु पाहिजे तसा सार्वत्रिक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरल्या गेले. समाधानकारक पावसामुळे आटोपल्या पेरण्या यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी या चारही तालुक्यात ८२ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. पावसाअभावी उपविभातील पेरण्या कांही प्रमाणात खोळंबल्या असल्या तरी आता पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे राहिलेली पेरणी येत्या चार दिवसात पुर्ण होईल, अशी अपेक्षा उपभिागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. यावर्षी कपासीच्या पेऱ्यात वाढ झाली असून तुरी आणि ज्वारीच्या पेरणीकडे सुध्दा शेतकरी वळले असल्याचे सातपुते म्हणाले.