शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

८१ शाळाबंदीचा निर्णय शासन आदेशानुसारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:30 IST

जिल्हा परिषदेने ८१ शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेताच अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि आदेशानुसारच घेण्यात आला आहे, असे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुचिता पाटेकर : समायोजनामुळे अतिरिक्त शिक्षकांचा योग्य वापर होईल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने ८१ शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेताच अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि आदेशानुसारच घेण्यात आला आहे, असे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात उमरखेड, महागाव सारख्या तालुक्यांमध्ये अनेक शाळांमध्ये विद्यार्थी असतानाही शिक्षक उपलब्ध नाहीत. तर काही तालुक्यांमध्ये विद्यार्थी अत्यंत कमी असतानाही शिक्षकांची संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळेच कमी पटाच्या शाळा समायोजित केल्यास अनेक अतिरिक्त शिक्षकांचा दुसऱ्या शाळेत उपयोग होऊ शकतो. या चांगल्या हेतूनेच शाळा समायोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही डॉ. पाटेकर म्हणाल्या.वास्तविक राज्य शासनाने कमी पटाच्या शाळा समायोजित करण्याचा आदेश जुलैमध्येच दिला होता. परंतु शैक्षणिक सत्र सुरू असताना समायोजन केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने हा निर्णय आता सत्र संपल्यानंतर जाहीर केला आहे. आरटीई कायदा, त्यातील शाळेच्या अंतराची तरतूद या सगळ्या गोष्टी पाळूनच शाळा समायोजन करण्यात येत आहे, असे शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी सांगितले. कमी पटाच्या शाळा समायोजित झाल्यास अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचा उपयोग अधिक पटाच्या शाळेसाठी होऊ शकेल. विद्यार्थीच नसलेल्या शाळेत शिक्षक ठेऊन त्यांच्यावर पगारापोटी शासनाने लाखो रुपयांचा खर्च का करावा, असा मुद्दाही शिक्षणाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.घाटंजीत ११ शिक्षक अतिरिक्तकमी पटाच्या शाळा समायोजित केल्यास अतिरिक्त शिक्षकांचा कसा चांगला वापर होऊ शकतो, यासाठी शिक्षणाधिकारी पाटेकर यांनी घाटंजी तालुक्याचे उदाहरण दिले. चिंचोलीतील शाळा बंद होणार आहे. तिथे २२ विद्यार्थी, दोन शिक्षक आहे. चिंचोली शाळेचे समायोजन कोपरी खुर्द येथे होणार आहे. कोपरीत सध्या ६१ विद्यार्थी, तीन शिक्षक आहेत. या दोन शाळेचे एकत्रितकरण झाल्यानंतर एकूण पटसंख्या ८३ होईल आणि संचमान्यतेनुसार ८३ विद्यार्थ्यांसाठी तीनच शिक्षक असतील. तर दोन अतिरिक्त शिक्षकांचा इतर गरजू शाळेसाठी वापर करता येणार आहे. हीच परिस्थिती घाटंजी तालुक्यातील वाघूपोड, केळापूर, विलायता जुना, पारधी बेडा, इंदिरानगर, वासरी पोड, टिटवी पोड येथील शाळांचीही आहे. या आठही शाळांचे समायोजन झाल्यावर एकंदर पटसंख्येनुसार ११ शिक्षक अतिरिक्त ठरतात. त्यांचा गरजू शाळेत वापर केला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकाºयांनी दिली.हजार विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ताआरटीईनुसार अंतराची अट पाळूनच जिल्हा परिषदेने शाळांचे समायोजन केले आहे. उलट आतापर्यंत जे विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळेत येत आहेत, त्यांना जिल्हा परिषद वाहतूक सुविधेपोटी भत्ता देत आहे. २०१८-१९ या सत्रात जिल्ह्यातील ८०९ विद्यार्थ्यांना हा भत्ता मासिक ३०० रुपये या प्रमाणे दहा महिन्यांचे पैसे देण्यात आले आहे. तर आता २०१९-२० या आगामी सत्रासाठी जिल्ह्यातील एक हजार तीन विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली. विशेष म्हणजे समायोजित होणाºया ८१ शाळांपैकी एकाही शाळेचे समायोजन कायद्यातील अंतरापेक्षा दूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक भत्त्याची सुविधा मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत !उमरखेड, महागाव सारख्या तालुक्यांमध्ये अनेक शाळांमध्ये विद्यार्थी असतानाही शिक्षक उपलब्ध नाहीत.विद्यार्थीच नसलेल्या शाळेत शिक्षक ठेऊन त्यांच्यावर पगारापोटी शासनाने लाखो रुपयांचा खर्च का करावा?एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शाळेत येत आहेत, त्यांना जिल्हा परिषद वाहतूक सुविधेपोटी भत्ता देत आहे.शैक्षणिक सत्र सुरू असताना समायोजन केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने हा निर्णय आता सत्र संपल्यानंतर जाहीर केला.