शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

३०० किमीच्या पाच राज्य मार्गांसाठी ७९० कोटींचे कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:35 IST

जिल्ह््यातील पाच प्रमुख मार्गांच्या बांधकाम व देखभाल-दुरुस्तीसाठी ७९० कोटी रुपयांचे कंत्राट मुंबईच्या एका कंपनीला शुक्रवारी मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबईची कंपनी : दोन वर्षात बांधकाम, दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह््यातील पाच प्रमुख मार्गांच्या बांधकाम व देखभाल-दुरुस्तीसाठी ७९० कोटी रुपयांचे कंत्राट मुंबईच्या एका कंपनीला शुक्रवारी मंजूर करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने राज्यात रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ‘अ‍ॅन्यूईटी’ हा उपक्रम आणला आहे. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३०० किलोमीटर लांबीच्या पाच रस्त्यांसाठी एकत्र निविदा काढण्यात आल्या होत्या. आंध्रप्रदेशातील राव आणि मुंबईच्या ईगल कंपनीने ही निविदा भरली. त्यात इगल सरस ठरल्याने अखेर ७९० कोटींची ही कामे या कंपनीला सोपविण्यात आली.त्यात यवतमाळ-दारव्हा-वाशिम, शेंबाळपिंपरी-पुसद-माहूर, पुसद-दिग्रस-दारव्हा-नेर, कळंब-घाटंजी, पांढरकवडा-शिबला-झरी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. मुंबईत मुख्यालय व नागपुरात शाखा कार्यालय असलेली ईगल कन्ट्रक्शन कंपनी या मार्गांचे पुढील दोन वर्षात बांधकाम करणार आहे. हे रस्ते सुस्थितीत आणले जाणार आहे. त्यानंतर या मार्गांचे पुढील दहा वर्षेपर्यंत देखभाल-दुरुस्ती याच कंपनीकडे राहणार आहे.पुसद-वाशिमचा प्रस्ताव‘अ‍ॅन्यूईटी’अंतर्गत पुसद-वाशिम या ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठीही सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा काढल्या होत्या. या निविदासुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.‘अ‍ॅन्यूईटी’अंतर्गत सुरुवातीला प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली गेली होती. परंतु कंत्राटदारांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच ही सर्व कामे एकत्र करून एकच जम्बो निविदा काढली गेली.

टॅग्स :highwayमहामार्गState Governmentराज्य सरकार