शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

अन्नदानासाठी ७५ वर्षीय साधू मागतो परिसरात भिक्षा

By admin | Updated: November 11, 2015 01:42 IST

अनेक भोंदू साधू भोळ्या जनतेची फसवणूक करून स्वार्थ साधतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात भिक्षा मागून मिळालेल्या ...

साधूची कमाल : मुकुटबन परिसरात चर्चेचा विषयमुकुटबन : अनेक भोंदू साधू भोळ्या जनतेची फसवणूक करून स्वार्थ साधतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिसरात भिक्षा मागून मिळालेल्या पैशातून एखाद्या मंदिराला अन्नदानासाठी पैसे व मिळालेले धान्य दान करणारा साधू बघून सर्वच आश्चर्यचकित होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कुंडलिक आडकू गेडाम (७५) असे त्या साधूचे नाव आहे. ते साईबाबाचा गणवेश परिधान करून वयाच्या २० व्या वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून जगाचा उद्धार व्हावा व दीन-दुबळ्यांना न्याय मिळावा, गोरगरिब जनता सुखी व्हावी, अडल्यानडल्यांची कामे व्हावी, भुकेल्यांना अन्न मिळावे, कर्म करून परब्रह्म करावा, हा उद्देश सफल करण्यासाठी गावोगावी भीक्षा मागतात. भिक्षेत कुणी दिलेले धान्य व मिळालेल्या पैशातून गोळा झालेली रक्कम एकत्र करून ते एखाद्या मंदिरला दान करतात. त्यातून ते अन्नदान करण्याचा आग्रह धरतात.त्यांनी नागपंचमीला परिसरातील भेंडाळा येथे मंदिरात अन्नदान केले. त्याचप्रमाणे येथील शबरी माता मंदिरातसुद्धा दोनदा अन्नदानाचा कार्यक्रम घेतला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात भटकंती करून अनेक मंदिरात अन्नदान केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रस्त्यावरील भुकेल्यांना, वेडसर व्यक्तींना, भिकारी, आजाराने ग्रस्त असलेल्यांना त्यांनी अनेकदा याच भीक्षेतून पैसे दिल्याचे सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कुणी त्यांना ‘साधूसंत येती घरा-तोची दिवाळी दसरा’, या म्हणीप्रमाणे प्रेमापोटी भोजनासाठी आमंत्रित करतात. कुणाला अपशब्द न बोलता ‘दिया सो दाता, नही दिया सो बी दाता’, असे म्हणून ते पुढील रस्ता धरतात. शरीर साथ देईपर्यंत ही सेवा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नसून सर्वधर्म समभाव’ या उक्तीप्रमाणे कार्य सुरू राहणार असल्यााचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)