शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीसाठी ७४.२७ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले.

भाग्य मशीनबंद : झरीत सर्वाधिक ८७.३३यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान आदिवासीबहुल झरी येथे ८७.३३ टक्के झाले. १०२ जागांसाठी ५८२ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले. मतदानाची मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत होती. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी जामणी, बाभूळगाव, राळेगाव आणि मारेगाव नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत सहाही ठिकाणी सरासरी ४८.८६ टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६३.४२ टक्के मतदान झाले होते. सहा नगरपंचायतीत ४३ हजार ३३१ मतदार होते. त्यात पुरुष २२ हजार १४३ तर महिला २१ हजार १८८ मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ३२ हजार १८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष १६ हजार ५४३ तर महिला १५ हजार ६४० मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानादरम्यान कुठेही अनूचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. आदिवासीबहुल झरी नगरपंचायतीच्या १६ जागांसाठी मतदान झाले. ९६३ मतदारांपैकी ८४१ म्हणजे ८७.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महागाव येथे १७ जागांसाठी ६ हजार ५०० मतदारांंपैकी ४ हजार ९६३ म्हणजे ७६.३५ टक्के, कळंब येथे १२ हजार ९२४ मतदारांपैकी ९ हजार ५३७ म्हणजे ७३.७९ टक्के, बाभूळगाव येथे चार हजार ९९९ मतदारांपैकी ३५ हजार ५७९ म्हणजे ७१.५९, राळेगाव ११ हजार ८६८ मतदारांपैकी ८ हजार ७७७ म्हणजे ७३.९६ आणि मारेगाव येथे ६ हजार ७७ मतदारांपैकी ४ हजार ४८६ म्हणजे ७३.८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (शहर वार्ताहर)