शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमधील भूखंड घोटाळ्यात ७ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 05:47 IST

‘एसआयटी’पुढे सूत्रधारांच्या अटकेचे आव्हान; गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता

- राजेश निस्ताने यवतमाळ : येथे उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत सात गुन्हे नोंदविले गेले असून आणखी १२ ते १५ तक्रारींची पोलिसांकडून शहानिशा केली जात आहे. त्यानंतर गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. त्याला सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कोट्यवधींचा हा भूखंड घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस उपअधीक्षक पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात १७ सदस्यीय ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी वापरले गेलेले शहरातील दोन झेरॉक्स सेंटर पोलिसांनी सील केले.राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे या घोटाळ्याचे प्रथमदर्शनी सूत्रधार आहेत. मात्र, त्यांचे मास्टरमाइंड प्रतिष्ठित असून त्यांना राजकीय अभय आहे. यादव युरोपात तर पन्हाळकर मुंबईत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या शोधार्थ मुंबईत गेलेले ‘एसआयटी’चे पथक नुकतेच रिकाम्या हाताने परतले.असा झाला भूखंड घोटाळामालक विदेशात अथवा बाहेरगावी असलेले भूखंड हेरायचे, त्याचा बनावट मालक उभा करून दुसऱ्याच्याच नावाने खरेदी करायची, नंतर याच भूखंडाची बाजार भावानुसार किंमत वाढवून ते बँकांमध्ये तारण ठेवायचे, त्यावर कोट्यवधींचे कर्ज उचलायचे, पुढे हे कर्ज थकीत झाल्यास बँकांनी त्या भूखंडांचा लिलाव करायचा व आपल्या कर्जाच्या रकमेची वसुली करायची, अशी भूमाफियांच्या गुन्ह्यांची पद्धत (मोड्स आॅपरेंडी) आहे.आदिवासींच्या जमिनी हडपल्या, थेट सीआयडी तपास का नाही?यवतमाळातील या भूखंड घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. भूमाफियांनी गोरगरीब आदिवासींच्या सुमारे १५० एकर जमिनी नाममात्र किमतीत हडपल्या आहेत. त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.बँका फसविल्या गेल्याबनावट मालकीच्या भूखंडावर कर्ज उचलले गेल्याने शहरातील तीन बँकांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. या कर्ज प्रकरणामध्ये बँकांचे अधिकारी, व्हॅल्यूअर, सर्च रिपोर्ट देणारे गुंतलेले आहेत. त्यामुळेच बँकांनी अद्याप पोलिसात फसवणुकीची तक्रार देणे टाळले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीYavatmalयवतमाळ