शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना ६० टक्क्यांपर्यंत अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:35 IST

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देउन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानयांत्रिकीकरण वाढविण्यावर भर, सोडत पद्धतीने होणार निवड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये यंत्र साहित्याच्या खरेदीसाठी ४० ते ६० टक्केपर्यंत मदत दिली जाणार आहे. त्यासाठी सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.अनेक पिढ्यांपासून शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती करीत आहेत. नव्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री शेतकऱ्यांकडे नाही. यामुळे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. या माध्यमातून सर्वच घटकातील शेतकऱ्यांना अनुदानावर यंत्र साहित्य मिळणार आहे. ४० ते ६० टक्केपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.यामध्ये अल्प, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ५० ते ६० टक्के अनुदानावर साहित्य दिले जाणार आहे. इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान मिळणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना २३ जूनपर्यंत तालुका कृषी कार्यालयात सातबारासह अर्ज करावा लागणार आहे. त्यातून ‘लकी ड्रॉ’द्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

२० हजार ते अडीच लाख अनुदानया योजनेत ट्रॅक्टर, स्वयंचलीत यंत्रे आणि औजारांचा समावेश आहे. कल्टीव्हेटर, पल्टीनांगर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, शुगरकेन कटर, सर्व प्रकारचे थ्रेशर, मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकींग मशिन, राईस मिल, दालमिल, पºहाटी थ्रेशर, ब्रश कटर याकरिता २० हजारांपासून अडीच लाखांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.विदर्भासाठी अनुदान मर्यादा वाढवाया योजनेत प्रत्येक भागासाठी उद्दिष्ट देण्यात आले. विदर्भातील गरजवंत शेतकऱ्यांकडे सध्या बियाणे घेण्याचीच ऐपत नाही. अशा स्थितीत यंत्र खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे विदर्भात अनुदानाची मर्यादा वाढविल्यास शेतकरी काही रक्कम गोळा करून साहित्यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे किमान विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी