शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

६० लाख खर्चाची चौकशी विभागीय सहनिबंधकांकडे

By admin | Updated: January 28, 2016 02:25 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी आपल्या खासगी न्यायालयीन लढाईचा ६० लाखांचा खर्च बँकेच्या तिजोरीतून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन चौकशी होत आहे.

जिल्हा बँक : सीईओ, याचिकाकर्त्यांना नोटीसयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी आपल्या खासगी न्यायालयीन लढाईचा ६० लाखांचा खर्च बँकेच्या तिजोरीतून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन चौकशी होत आहे. विभागीय सहनिबंधक या प्रकरणात चौकशीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेचे सीईओ आणि याचिकाकर्त्यांना नोटीस बजावून त्यांची बाजू ऐकून घेणार आहे.जिल्हा बँकेचे १४ संचालक ज्या सेवा सोसायट्यांचे प्रतिनिधी आहेत त्या सोसायट्या थकीत झाल्याने तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी या संचालकांना अपात्र ठरविले होते. गेल्या सहा वर्षांपासून हे प्रकरण सहकार आयुक्त, सहकार मंत्री, नागपूर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा विविध पातळ्यांवर सुरू आहे. त्याचा खर्च संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून केला. या ६० लाख रुपयांच्या उधळपट्टी विरोधात राळेगाव येथील सदाशिव महाजन यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांना दिले आहे. त्यानुसार गुरुवारी २८ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा बँकेचे सीईओ आणि याचिकाकर्ते सदाशिव महाजन यांना नोटीस जारी केली जाणार आहे. या दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर खासगी कामावर शासकीय तिजोरीतून खर्च झाल्याचे आढळून आल्यास व आवश्यकता भासल्यास गैरअर्जदार संचालकांना नोटीस बजावली जाणार असल्याचे अमरावती येथील प्रभारी विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संगीता डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. निबंधकांना हा चौकशी अहवाल तीन महिन्यात उच्च न्यायालयात सादर करावयाचा आहे. खासगी कामासाठी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपये खर्च झाल्याचे निबंधकांच्या चौकशीत सिद्ध झाल्यास या १४ संचालकांना आगामी निवडणुकीत अपात्रसुद्धा ठरविले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पुन्हा जबाबांचा फार्स कशासाठी ?याचिकाकर्ते सदाशिव महाजन यांनी बयानांचा फार्स कशासाठी असा प्रश्न ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला आहे. महाजन म्हणाले, या प्रकरणात यापूर्वीसुद्धा विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांच्यापुढे दोन वेळा सुनावणी झाली आहे. त्याच्या समक्षच माझी बयाने नोंदविली गेली. त्यावेळी संचालकांनी खासगी प्रकरणात बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे सिद्ध झाले आहे. सहनिबंधकांनी बँकेतून प्रोसेडिंग बोलवावे, त्यावर कुणाकुणाच्या स्वाक्षऱ्या आहेत ते तपासावे, खर्च झाला की नाही हे पाहण्यासाठी कॅश बुक बोलवावे. हा खर्च झाला की नाही हे पाहण्यासाठी कुणाच्याही बयानाची आता गरज नाही. माझ्या बयानात तर यापूर्वीच याबाबी सिद्ध झाल्या आहेत. ही बयानबाजी म्हणजे वेळ काढू धोरण व पळवाटा शोधण्याचा मार्ग असल्याची टीकाही सदाशिव महाजन यांनी सहकार प्रशासनाच्या कारभारावर केली आहे. यावर उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार असल्याचे महाजन म्हणाले.