लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगराध्यक्ष वैशाली नहाते यांनी सन २०१८-१९ चे सुधारित व २०१९-२० च्या संभाव्य अर्थसंकल्पावर मंजुरीची मोहोर उमटविली. ५७ कोटी ९५ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला हिरवा कंदील दाखविला असून, सहा कोटी १० लाख रुपयांचे हे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.नगराध्यक्ष वैशाली नहाते यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय सभा घेण्यात आली. मुख्याधिकारी संदीप बोरकर व लेखापाल रवींद्र मंचलवार यांनी २०१८-१९ चा सुधारित व २०१९-२० चा संभाव्य अर्थसंकल्प सभेत सादर केला. यामध्ये प्रारंभिक शिल्लक पाच कोटी ९३ लाख दर्शविण्यात आली. नवीन अंदाजपत्रक सादर करताना सेवा आर्थिकदृष्ट्या त्रुटीत येऊ नये म्हणून उपाययोजना आखल्या. उत्पन्नात वाढ होण्यासाठी नवीन गाळे निर्मिती, एलईडी पथदिवे, ईई-एसएल कंपनीचे लाईट बसविणे, वाढीव पाणीपुरवठा योजनेतून हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांसाठी पाणी पुरवठ्याच्या टाकीचे बांधकाम, पाइपलाइन, रस्ते-नाल्याकरिता विशेष निधी उपलब्ध करून घेणे आदी तरतूद केली आहे. विशेष म्हणजे शहरातील खेळाडूंसाठी खेळ व क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता १० लाखाची तरतूद केली आहे. बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित होते.पांढरकवडातील खुल्या जागांचे करणार सौंदर्यीकरणअंदाजपत्रकीय सभेत नगराध्यक्षांनी शहरातील खुल्या जागांच्या सौंदर्यीकरणावर भर दिला. अशा जागांवर बगिच्यांची निर्मिती करणे अजेंड्यावर घेतले. शहरातील नागरिकांना विरंगुळा मिळेल, अशी ठिकाणे नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांनी या बाबीला भविष्यात प्राधान्याने पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:05 IST
नगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत नगराध्यक्ष वैशाली नहाते यांनी सन २०१८-१९ चे सुधारित व २०१९-२० च्या संभाव्य अर्थसंकल्पावर मंजुरीची मोहोर उमटविली.
पांढरकवडा पालिकेचा ५८ कोटींचा अर्थसंकल्प
ठळक मुद्देप्रारंभिक शिल्लक पाच कोटी ९३ लाख : शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद