शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कारमधून ५५ किलो चांदी जप्त

By admin | Updated: February 1, 2017 01:30 IST

निवडणूक विभागाच्या पथकाने स्थानिक धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे एका संशयास्पद कारची

मोहा फाट्यावरील प्रकार : निवडणूक पथकाची कारवाई यवतमाळ : निवडणूक विभागाच्या पथकाने स्थानिक धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे एका संशयास्पद कारची झडती घेतली असता तब्बल ५५ किलो वजनाचे चांदीचे दागिने आढळून आले. ही कारवाई मंगळवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात आली. या दागिण्यासंदर्भात व्यापाऱ्याकडे कोणतचे अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नसल्याने चांदी कोषागारात ठेवण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. यवतमाळ येथून कार (क्र. एमएच१२/एलडी^-२२४५) मंगळवारी धामणगाव मार्गाने जात होती. या कारमध्ये चालकासह तिघे जण बसून होते. मोहा येथील तपासणी नाक्यावर कार्यरत महिला पोलीस शिपाई निलीमा जांभुरे यांना संशय आल्याने कार तपासणीसाठी थांबविली. कारची तपासणी केली असता, डिक्कीत पाच बॅगमध्ये चांदीचे दागिणे आढळून आले. याबाबत व्यापारी जिग्नेश जयंतीलाल हिंडोचा (४०) रा. सिव्हील लाईन, यवतमाळ यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी संशयास्पद उत्तरे दिली. शिवाय दागिण्याबाबत कोणतेच अधिकृत दस्तऐवज त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे निवडणूक पथकाने वाहन तहसील कार्यालयात जमा केले. सदर दागिने बाबू उर्फ विक्की वसंत शहा (४२) रा. यवतमाळ यांचे असल्याचे सांगण्यात आले. शहा यांचे सराफा बाजारपेठेत तुलसी ज्वेलर्स आहे. तेथून दागिने काटोल येथे विक्री करीता नेत असल्याचे हिंडोचा याने सांगितले. या दागिण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन शेजाळ यांनी व्यापाऱ्याकडे खुलासा मागितला. तेव्हा त्यांनी केवळ तीन किलो दागिण्याचेचे बिल सादर केले. त्यामुळे या प्रकरणात खवले यांनी दागिने पंचासमक्ष सील करून कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले. शिवाय शहर पोलिसांना या अवैध दागिण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. तपासणी पथकाने अवैध चांदी मिळाल्याची माहिती शहर पोलिसांना दिली. मात्र वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ५५ किलो चांदीचे दागिने असल्याचे व्यापारी जिग्नेश हिंडोचा याच्याकडून सांगण्यात आले होते. माळीपुरा येथील अनिल वनवे याची कार भाड्याने घेऊन ते काटोलकडे जात असल्याचे हिंडोचा यांनी सांगितले. या प्रकरणात प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्याला खुलासा मागण्यात आला आहे. योग्य दस्तऐवज न मिळाल्यास याची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी) पहिलीच कारवाई ४जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता काळात यवतमाळ पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई होय. या चांदीच्या दागिन्यांचा विक्रीकर विभागाकडूनही तपास होत आहे.