शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दीड वर्षात एसीबीचे ५२ गुन्हे शाबित; ६२ आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:16 IST

जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक पोलीस व महसूल विभागात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.गेल्या दीड वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडणे, लाचेची मागणी, अपसंपदा या संबंधी शेकडो गुन्हे दाखल केले. त्यापैकी ५२ गुन्हे शाबित झाले. त्यात ६२ जणांना शिक्षा ठोठावली गेली. त्यामध्ये वर्ग-१ चे १२ तर वर्ग-२ च्या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग-३ च्या ३४ तर वर्ग-४ च्या दोघांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. याशिवाय दोन इतर लोकसेवक व दलाला म्हणून काम करणाºया पाच खासगी व्यक्तींनाही शिक्षा ठोठावली गेली आहे.गुन्हे शाबित झालेली सर्वाधिक १५ प्रकरणे पोलीस खात्याची आहे. त्या खालोखाल महसूल-भूमिअभिलेख व नोंदणी विभागाची ११, पंचायत समिती पाच, जिल्हा परिषद चार, वन विभाग तीन, नगरविकास (मनपा/सिडको) दोन, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रत्येकी दोन तर विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, प्रादेशिक परिवहन, सहकार व पणन, राज्य परिवहन, सिडको या विभागातील प्रत्येकी एक गुन्हा सिद्ध झाला. आदिवासी विकास विभागातील मात्र एकही प्रकरण गेल्या दीड वर्षात एसीबीला शाबित करता आलेले नाही.दहा लाखांचा दंड वसूलगुन्हे सिद्ध होऊन शिक्षा झालेल्या ६२ आरोपींकडून दहा लाख ९० हजार ५०० रुपयांची रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक रक्कम नगरविकास पाच लाख एक हजार, महसूल विभाग एक लाख ६५ हजार तर पोलीस विभागाकडून एक लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.सर्वाधिक भंडारा, नाशिकमध्येगुन्हे शाबित होऊन शिक्षा झालेली प्रकरणे नांदेड, नाशिक, भंडारा, बीड, चंद्रपूर, मुंबई, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद शहर व ग्रामीण, मुंबई, ठाणे, जळगाव, खामगाव-बुलडाणा, पुणे, सातारा व लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यातही भंडारा, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील प्रकरणे अधिक आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग